मुंबई : बॉलिवूडमधील अधिकाधिक कलाकार सोशल मीडियावर सक्रिय आहेत. फेसबुक, इन्स्टाग्राम अशा विविध माध्यमांतून हे कलाकार चाहत्यांशी संपर्क साधत असतात. फोटो आणि व्हिडीओंद्वारे ही कलाकार मंडळी जणू त्यांच्या आयुष्याचाच मोठा भाग चाहत्यांपुढं ठेवतात. पण, असं करणं कायमच कलाकारांना फायद्याचं ठरतं असं नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेता हृतिक रोशन यानं सध्या याचाच सामना केला. पण, यावर त्यानं उत्तरही दिलं. हृतिकनं नुकतंच सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये तो मिरर सेल्फी घेताना दिसत आहे. ज्यामध्ये त्याची आई, घराच्या बाल्कनीमध्ये उभी असल्याची पाहायला मिळत आहे. हा अतिशय सुरेख फोटो हृतिकनं चाहत्यांसोबत शेअर केला. पण, नेटकऱ्यांनी मात्र त्यालवरुनच त्याची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली. 


काहींनी या फोटोला पसंती दिली. पण, काहींनी मात्र हृतिकच्या घराच्या भींतीवर आलेल्या पोपड्यांकडे साऱ्यांचं लक्ष वेधलं. लक्ष देऊन पाहा, हृतिकच्या घरात पोपडे...., अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली. तर, हृतिक सर माझा 2 बीएचके फ्लॅट घ्या, तिथं पोपडे नाहीत अशी कमेंटही दुसऱ्या नेटकऱ्यानं केली. आपल्या फोटोवर येणाऱ्य़ा या सर्व कमेंट पाहता हृतिकनंही काहीसं त्याच अंदाजात उत्तर दिलं. अहो हे घर भाडे तत्वावर आहे..... लवकरच स्वत:चं घर घेईन...  असं तो म्हणाला. तर, दुसऱ्या एका युजरला म्हणाला, अहो पोपड्या नसलीतल तर त्या ठीक करुन घेण्यात कसली मजा? 



घरातील भींतीवर आलेल्या पोपड्या पाहून चाहत्यांनी हृतिकची खिल्ली उडवली खरी, पण त्यानंही याकडे नकारात्मकपणे न पाहता विनोदी अंगानंच या साऱ्याकडे पाहिलं.