मुंबई : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन अभिनयासह त्याच्या फिटनेस आणि लूक्समुळेही नेहमी चर्चेत असतो. हृतिकचे भारतातच नाही तर परदेशातही जबरदस्त चाहते आहेत. नुकतंच एका अमेरिकन एजेन्सीने, जगातील 'मोस्ट हॅन्डसम' व्यक्ती म्हणून हृतिकची निवड केली आहे. या 'मोस्ट हॅन्डसम' यादीमध्ये हृतिकने हॉलिवूड स्टार्स क्रिस इवांस, डेविड बेकहम, रॉबर्ट पॅटिनसन यांनाही मागे टाकलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतात हृतिकला 'ग्रीक गॉड' या नावानेही ओळखलं जातं. ऑगस्ट २०१९ टॉप ५ मोस्ट 'हॅन्डसम मेन इन द वर्ल्ड' या यादीमध्ये हृतिक पहिल्या स्थानी पोहचला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'हॅन्डसम मेन इन द वर्ल्ड'साठी मतदान करण्यात आलं होतं. या मतदानानंतर हृतिकचं नाव टॉप ५ मध्ये पहिल्या नंबरवर आलं आहे.




हृतिकच्या 'सुपर ३०'च्या दमदार यशानंतर आता हृतिक आगामी 'वॉर' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात हृतिकसह टायगर श्रॉफ आणि वाणी कपूरही स्क्रिन शेअर करणार आहे. येत्या २ ऑक्टोबरला 'वॉर' चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.