मुंबई : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) हा सध्या त्याच्या सबा आझाद हिच्याशी असणआऱ्या नात्यामुळं चर्चेत आला आहे. नुकतंच मुंबईत एका रेस्तराँबाहेर  (Saba Azad) सबाचा हात हातात घेऊन हृतिक बाहेर पडताना दिसला. असं म्हटलं की, ते दोघं डिनर डेटसाठी तिथे गेले होते. हृतिकचं हे नातं सर्वांसमोर आलंही नसतं. पण, एक चूक आणि तो फसला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकं काय झालं? 
सबा आणि हृतिक एकमेकांचा हात पकडून रेस्तराँमधून बाहेर आले खरे. पण, तिथे मात्र अनेक छायाचित्रकारांची गर्दी झाली होती. 


ही जोडी हॉटेलमधून बाहेर येताच त्यांचे फोटो टीपले गेले. तसं, घाईने हृतिक त्याच्या कारपाशी आला. तो लगेचच कारमध्ये बसून त्या ठिकाणहून निघून जाणं अपेक्षित होतं. 


पण, काहीतरी बिनसलं आणि कारचं दार उघडेना, शेवटी कार चालकाला 'वापस कर दे' असं म्हणत हृतिकनं लगेचच कारचं दार उघडलं आणि ती दोघं याच कारने परतले. 


तिथे हृतिक पेचात पडलेला असतानाच सबाशी काही माध्यमांनी संवाद साधल्याचं पाहायला मिळालं. तिला हृतिकसोबतच्या नात्याचे प्रश्नही विचारले गेले. 


सबानं मात्र या प्रश्नांची उत्तरं न देताच तिनं कॉल कट केला, अशी माहिती समोर आली. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by yogen shah (@yogenshah_s)


हृतिकबाबतचा प्रश्न विचारताच काय म्हणाली सबा? 
डेटिंगच्या चर्चांनी जोर धरताच सबावर हृतिकसंबंधीच्या प्रश्नांचा भडीमार केला गेला. या प्रश्नांची उत्तरं देताना ती अडखळली. 


'मी सध्या काही कामांमध्ये बिझी आहे, मी नंतर कॉल करते', असं ती म्हणाली आणि नेहमीच्या कारणानं तिनं हा संवाद संपवला.