किसिंगच्या सर्व सीमा ओलांडणाऱ्या इमरान हाश्मीला जेव्हा पत्नीनं ‘रंगे हाथ’ पकडलं…
अभिनेता इमरान हाश्मी म्हणजे कोणा एकेकाळी तरुणींच्या गळ्यातील ताईत.
मुंबई : अभिनेता इमरान हाश्मी म्हणजे कोणा एकेकाळी तरुणींच्या गळ्यातील ताईत. त्यानं जितकी वाहवा त्याच्या चित्रपटांसाठी मिळवली नाही, तितकी चर्चा त्याच्या किसिंग सीन्सची झाली. आता मात्र तो अशी दृश्य फारशी साकारताना दिसत नाही. असं नेमकं का, काय झाली, की तो आता अशी दृश्य करत नाही... वगैरे वगैरे... पडतायत का तुम्हालाही असे प्रश्न?
चित्रपटांतून विविध भूमिका साकारणारा इमरान पुढे जाऊन सिरियल किसर म्हणून ओळखला गेला. अनेकदा तर अभिनेत्रींनीही त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करण्यास नकार दिला होता.
संसारातही निर्माण झाला तणाव...
इमरानचे हे रोमँटिंक सीन त्याच्या वैवाहिक आयुष्यात तणाव निर्माण करुन गेले. अनेकदा तर त्याच्या पत्नीनंही त्याच्यावर संशय करण्यास सुरुवात केली होती.
एकदा तिच्या ह्ट्टावरून इमरान तिला चित्रपट पाहण्यासाठी घेऊन गेला. पण तिथे गेल्यावर परवीन म्हणजेच इमरानच्या पत्नीनं असं काहीतरही पाहिलं, की ती लगेचच त्याच्यावर संतापली.
एका रोमँटिक चित्रपटासाठी इमराननं परवीनचा थिएटरला नेलं. पण, त्या चित्रपटात त्यानंच अभिनेत्रीशी इतका रोमॅन्स केला होता, की अभिनेत्रीला तो किस करत आहे हे पाहून तिचा राग अनावर झाला.
पुढे लगेचच त्याचा एक रोमँटिक सीन सुरु झाला आणि तेव्हा तर तिनं इमरानला नखांनी बोचकरण्यास सुरुवात केली. तू चित्रपटांमध्ये हे सगळं करतोस आणि मला सांगितलंसुद्धा नाहीस..., असं म्हणत ती त्याला रागे भरत होती.
इमरान चित्रपटांमध्ये अशा भूमिका साकारत असला तरीही त्याच्या पत्नीनं मात्र हे अद्यापही स्वीकारलेलं नाही. खुद्द इमराननंच एका मुलाखतीत याचा खुलासा केला. पण, या दोघांनी यावर एक तोडगा मात्र काढला आहे.
जेव्हा जेव्हा आता इमरान असे रोमँटिक सीन करतो तेव्हा तेव्हा पत्नीला खरेदीसाठी नेणं ही त्याची शिक्षा असते. नात्यात विश्वासाचा पाया भक्कम ठेवत पुढे तो जपणं हेच त्यांच्या या गोड नात्यातून पाहायला मिळतं नाही का?