मुंबई : राकेश बापटने आपल्या आशयघन संवादाने 'खुर्ची' चित्रपटाला वजन आणलं आहे. चित्रपटात अभिनेता राकेश बापटने दिलेलं वळण चित्रपटाची उंची वाढवतंय. सत्तेसाठी खेळल्या जाणाऱ्या या लढाईत अभिनेता राकेश बापटची महत्वपूर्ण भूमिका पाहायला मिळत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'खुर्ची' या चित्रपटात दमदार भूमिकेत राकेश बापटला पाहणं रंजक ठरतंय. आत्मनिर्भर, स्वबळाने आणि मुख्यत्वे बुद्धीचा वापर करून स्वतःच विश्व निर्माण करणाऱ्या अशा महत्वपूर्ण भूमिकेत राकेश पाहायला मिळतोय. आजवर राकेशने त्याच्या अभिनयकौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकलीच आहेत. आता पुन्हा एकदा राकेशमधील करारीपणा 'खुर्ची' या सिनेमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. खुर्चीसाठीची लढाई राकेश लढणार का? आणि चित्रपटातील सत्तेसाठीच्या या लढाईत राकेशला खुर्ची मिळणार का? हे पाहणं रंजक ठरणार. 


संतोष कुसुम हगवणे प्रस्तुत 'आराध्या मोशन फिल्म्स',' आणि 'योग आशा फिल्म्स' निर्मित या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा संतोष कुसुम हगवणे, योगिता गवळी आणि प्रदीप नत्थीसिंग नागर यांनी बरोबरीने सांभाळली आहे. डॉ. अमित बैरागी आणि आतिश अंकुश जवळकर यांची सहनिर्मिती असून राजकारणाचे विविध रंग या चित्रपटात रेखाटण्यात आले आहे.  या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद निर्माते संतोष कुसुम हगवणे यांची असून दिग्दर्शक शिव धर्मराज माने आणि संतोष कुसुम हगवणे यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा उत्तमरीत्या पेलवली आहे.



तर क्रिएटिव्ह हेड म्हणून प्रतिक वसंतराव पाटील यांनी बाजू सांभाळली आहे. या चित्रपटात राकेश बापट, अक्षय वाघमारे,आर्यन हगवणे, सुरेश विश्वकर्मा, महेश घग, अभिनेत्री , प्रीतम कागणे, कल्याणी नंदकिशोर, श्रेया पासलकर या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. याशिवाय अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले यांनी ही चित्रपटात दमदार भूमिका साकारली आहे.


'खुर्ची' हा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट येत्या नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजेच १२ जानेवारी २०२४ मध्ये येणार असून 'खुर्ची'चं राजकारण पाहण्यासाठी प्रेक्षकांना आणखी काही काळ वाट बघावी लागणार आहे.