मुंबई : विनोदवीर कपिल शर्मा सध्या छोट्या पडद्यावर दणक्यात पुनरागमन करण्यासोबतच आणखी एका गोष्टीवरही लक्ष केंद्रीत करत आहे. ती गोष्ट म्हणजे लग्नाची तयारी. येत्या काही दिवसांमध्ये कपिल त्याची प्रेयली गिन्नी छतरथसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१२ डिसेंबरला गिन्नी आणि कपिलचा विवाहसोहळा पार पडणार आहे. पण, त्याआधीपासूनच आता त्याच्या आणि गिन्नीच्या घरी त्यांच्या लग्नसोहळ्यातील विविध विधी आणि समारंभांना सुरुवात झाली आहे. जालंधर येथील पगवाडामध्ये असणाऱ्या तिच्या घरी मोठ्या उत्साहात सर्व विधी पार पडत आहेत. 





सोशल मीडियावर बऱ्याच फॅन पेजेसकडून यासंबंधीचे फोटो आणि व्हिडिओही शेअर करण्याय येत आहेत. ज्यामध्ये अखंड पाठ, चुडा असे सर्व समारंभ पाहायला मिळत आहेत. 



गिन्नी आणि कपिल पारंपरिक पंजाबी, शीख पद्धतीने विवाहबंधनात अडकणार आहेत. रिलेशनशिपमध्ये येणारे सर्व अडथळे, चढ उतार या सर्व गोष्टी पार करत अखेर कपिल आणि गिन्नी या वळणावर पोहोचले आहेत. त्यामुळे आता येत्या काळात त्यांच्या भावी आयुष्यात सुखाची आणि आनंदाची बरसात करो अशीच कामना चाहते करत आहेत.