मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा सध्या तिच्या आगामी 'निकम्मा' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये गुंतलीय.या चित्रपटाच्य़ा प्रमोशनच्य़ा मुलाखतीत शिल्पा अनेक किस्से सांगतेय. अशाच एका मुलाखतीत तिने तिच्या क्रशचे नाव सांगितले आहे. तसेच आईसोबतचा लहाणपणीचा किस्साही सांगितलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आईसोबतचा किस्सा 


शिल्पाने मुलाखतीत लहाणपणीचा किस्सा सांगितला. आई सुनंदा हिने शिल्पाचा निकाल पाहून तिला 'निक्कमी ' आणि 'एकदम बेकार' म्हटले होते. ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत शिल्पाने सांगितले की, 'जेव्हा माझ्या आईने माझा निकाल पाहिला तेव्हा ती पहिल्यांदा माझ्यावर ओरडली, आणि म्हणाली की तू पूर्णपणे निरुपयोगी आणि सर्वात वाईट होत चाललीस. 


क्रश आहे तरी कोण? 
शिल्पा शेट्टीने एका मुलाखतीत आपल्या क्रशचेही नाव सांगितले आहे. शिल्पा शेट्टीचा क्रश दुसरा कोणी नसून बॉलिवूडचा हँडसम हंक कार्तिक आर्यन आहे. शिल्पाला विचारण्यात आले की तिला बॉलिवूडमध्ये कोण आवडते. या प्रश्नावर शिल्पाने कार्तिक आर्यनचे नाव घेतले. झूम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत, शिल्पाने एक रॅपिड-फायर राउंड खेळला जिथे तिने स्वतःबद्दल अनेक मनोरंजक गोष्टी सांगितल्या. 


 शिल्पाच्या 'निकम्मा' या चित्रपटात शिल्पाशिवाय अभिमन्यू दासानी आणि शर्ली सेटिया यांच्याही मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटात शिल्पा एका सुपरवुमनच्या भूमिकेत दिसणार आहे. 'निकम्मा' उद्या म्हणजेच १७ जून रोजी रिलीज होणार आहे.