मुंबई : काही दिवसांपूर्वी अभिनेते किरण कुमार यांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याच्या चर्चांना चांगलाच जोर धरला होता. परंतु आता त्यांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे समजत आहे. १४ मे रोजी किरण कुमार यांना सर्दी, ताप, खोकला अशी कोरोनाची लक्षणं दिसून आली होती. त्यामुळे त्यांनी स्वतःला राहत्या घरात आयसोलेशनमध्ये ठेवेले होते. आता त्यांची प्रकृती उत्तम असल्याचं सांगितलं जात आहे. किरण कुमार  यांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे त्यांच्या चाहत्यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याबाबत खुद्द किरण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, 'माझे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे मी फार आनंदी आहे. माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य सेल्फ आयसोलेशचं पालन करत आहेत. मी आयुष्यातील छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आनंद मानत आहे. दररोज योगा करतो शिवाय ओटीटीवर वेग-वेगळे चित्रपट, वेबसीरिज पाहतो.' असं ते म्हणाले. 


किरण यांना दोन आठवड्यांपूर्वी किरकोळ वैद्यकीय तपासणीसाठी रूग्णालयात घेवून जाण्यात आलं होते. तेव्हा त्यांना कोरोनाची लागण झाल्याच्या चर्चांनी जोर धरला होता.  १४ मे रोजी केलेल्या चाचणीमध्ये कोरोना चाचणीचा देखील समावेश होता. असं एका इंग्रजी वृत्तसंस्थेने सांगितले आहे. 


यापूर्वी गायिका कनिका कपूरला या धोकादायक विषाणूची लागण झली होती. जवळपास पाच चाचण्यांनंतर तिचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले. आता तिची प्रकृती उत्तम आहे. सध्या ती लखनऊमध्ये आपल्या आई-वडिलांसोबत राहत आहे.