मुंबई : बॉलिवूडचा असा अभिनेता ज्याला चित्रपटात कधी मुख्य कलाकाराची भूमिका हाती लागली नाही, परंतु बांग्लादेशी चित्रपटांमध्ये आपले वर्चस्व गाजवणारा अभिनेता चंकी पांडे उर्फ सुयश पांडे. चंकी पांडे त्याचा वाढदिवस आज मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत. त्याने १९८१ साली 'रॉकी' चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या करियरची सुरूवात केली. फक्त फ्लॉप चित्रपट, विनोदी भूमिका आणि खलनायकाच्या भूमिका त्याच्या वाट्याला आल्या. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याव्यतिरिक्त चंकीची आणखी एक ओळख आहे ती म्हणजे, तो हुबेहूब पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या सारखा दिसतो. सोशल मीडियावर जेव्हा ही पाकिस्तानचे पंतप्रधान यांना ट्रोल केलं जातं, तेव्हा काही मिम्स चंकी पांडेवर देखील करण्यात येतात. 


त्याचप्रमाणे चंकी पांडे आणि अभिनेता अक्षय कुमार अनेक चित्रपटांच्या माध्यमातून एकत्र झळकळे होते. एवढंच नाही तर हे दोघे एकाच डान्स क्लासला सुद्धा जायचे. शिवाय अक्षयनं त्याच्या कडून नृत्याचे धडे देखील गिरवले आहेत. 


बॉलिवूडमध्ये हवं तसं यश न मिळाल्याने त्याने आपला मोर्चा बांग्लादेशी चित्रपटांकडे वळवला. चंकी पांडेने बांग्लादेशात 'स्वामी केनो असामी', 'बेश कोरेची प्रेम कोरेची', 'मेयेरा ए मानुष' सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं. त्यानंतर पुन्हा त्यांनी बॉलिवूडमध्ये प्रवेश केला.