मुंबई : लोकप्रिय आणि ज्येष्ठ निर्माते- दिग्दर्शक यश चोप्रा यांचा मुलगा उदय चोप्रा याला बॉलिवूडमध्ये फारशी उल्लेखनीय कामगिरी करता आलेली नाही. एक अभिनेता म्हणून कारकिर्दीची सुरुवात करण्यापूर्वी त्यानं निर्मिती, दिग्दर्शन आणि पटकथा लेखन अशा विभागांमध्येही काम केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मोहोब्बतें' या चित्रपटापासून कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या उदयला वारंवार अपयशाचा सामना करावा लागला. असं असलं तरीही कमाईच्या बाबतीत मात्र तो कायमच सर्वांना थक्क करत होता. 


चित्रपटांसाठी पूरक असणाऱ्या वातावरणातच उदय मोठा झाला होता. यश चोप्रा यांच्यासोबतही त्यानं बरंच काम केलं. 


पदार्पणाच्याच चित्रपटामध्ये ऐश्वर्या राय, शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन अशी लोकप्रिय नावं असल्यामुळं उदयला अपेक्षित लोकप्रियता मिळूच शकली नाही. 


'धूम'मुळं खास ओळख 
'धूम'या चित्रपटामुळं उदयला बऱ्यापैकी लोकप्रियता मिळाली. पण, यानंतर मात्र त्याला पुन्हा अपयशाचाच सामना करावा लागला. 


उदय त्याचा भाऊ, आदित्य चोप्रा याच्या साथीनं वायआरएफ एंटरटेनमेंट (YRF Entertainment) आणि यशराज फिल्म्स (Yashraj Films)चं काम पाहतो. 


शिवाय 'योमिक्स' नावाची त्याची एक कंपनीही आहे. यशराज चोप्रा यांच्या चित्रपटांना कॉमिक च्या रुपात सादर करण्याचं काम ही कंपनी करते. 


सूत्रांच्या माहितीनुसार उदयचं वार्षिक उत्पन्न जवळपास 38 कोटी रुपये इतकं असल्याचं सांगण्यात येत आहे. 


लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत नसतानाही त्याच्या कमाईचा हा आकडा नक्कीच थक्क करणारा आहे.