मुंबई : जगभरात नावलौकिक मिळवणाऱ्या आणि अतिशय मोठ्या अशाय हिंदी चित्रपटसृष्टीत काही कलाकारांनी स्वत:च्या बळावर स्थान मिळवलं. त्याच यादीतील एक नाव म्हणजे अभिनेता पंकज त्रिपाठी यांचं. दमदार अभिनय आणि कमालीच्या आत्मविश्वासाच्या बळावर पंकज त्रिपाठी यांनी बॉलिवूडसोबतच वेब विश्वातही आपली वेगळी छाप सोडली. असा हा अभिनेता आता ज्या अंदाजात दिसत आहे, त्याचा तो अंदाज प्रेक्षकांनी कधीही पाहिला नसावा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कारण, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमध्य़े ते चक्क ढोलक वाजवताना दिसत आहेत. शशी समदनं शेअर केलल्या एका व्हिडीओमध्ये त्रिपाठी यांची ही वादनाची कलाही सर्वांची मनं जिंकून जात आहे. 


रुपेरी पडदा असो किंवा मग वेब सीरिज, पंकज त्रिपाठी यांनी आतापर्यंत गँगस्टर आणि काही नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत. कुठे ते काळजी करणाऱ्या वडिलांच्या भूमिकेतही दिसते. पण, प्रेक्षकांसमोर येणाऱ्या त्यांच्या या रुपाच्या अतिशय वेगळी अशी त्यांची खऱ्या आयुष्यातील प्रतिमा आहे. 



वर्कफ्रंटविषयी सांगावं तर, 2020 आणि 2021 हे वर्ष पंकज त्रिपाठी यांच्यासाठी यश मिळवून देणारं वर्ष ठरलं आहे. येत्या काळात ते 83, बच्चन पांडे, OMG 2, क्रिमिनल जस्टीस 3 मध्येही दिसणार आहेत.