बॉलिवूड अभिनेता आर माधवनने (R Madhavan) आयुष्यात येणाऱ्या तणावाचा सामना कसा करायचा यासाठी सल्ला दिला आहे. मग तुम्ही जेन झेड किंवा जेन एक्स असलात तरी फरक पडणार नाही. Power Breakfast with Curly Tales मध्ये पोहोचलेल्या आर माधवनने आपली निरोगी लाईफस्टाइल कशी आहे याबद्दल सविस्तरपणे सांगितलं. तसंच व्यग्र वेळापत्रकामुळे तणाव वाढणार नाही याचीही कशाप्रकारे काळजी घेतो याबद्दल सांगितलं. हे सांगताना आर माधवनने आपण प्रमाणपत्रप्राप्त डॉक्टर किंवा शिक्षक नाही, मात्र आयुष्यातील अनुभवांच्या आधारे हे सांगत असल्याचं स्पष्ट केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"तुम्ही सकाळी सोशल मीडिया सुरु केला की, 10 हजार गुरु आयुष्य जगण्याचे 20 हजार मार्ग सांगत असतात. प्रत्यकेजण आयुष्य कसं जगावं आणि त्यात काय चुकीचं सुरु आहे याबद्दल जाणून घेत असतो. पण ते सर्वजण चुकीचे आहेत. कारण त्यांची स्थिती तुमच्यासारखीच नसते. तुम्ही आणि मी दोघेही दाक्षिणेकडील असलो तरी आपण जगाच्या दोन वेगळ्या टोकावर जन्माला आलेले असू शकतो. त्यामुळे आपण वेगळ्या नियमांमध्ये वेगळं आयुष्य जगू शकत असू. त्यामुळे मला ज्या कारणांमुळे तणाव आला आहे, तो दुसऱ्याच्या तणावापेक्षा वेगळा असू शकतो," असं आर माधवनने म्हटलं आहे.


बॉक्स ब्रिदिंग 


आर माधवनने यावेळी तणाव हा आपल्या आयुष्याचा भाग असून जर तो नसेल तर मेंदू विकसित होणार नाही असंही सांगितलं. तसंच तणाव घालवण्यासाठी आपण काय करतो याचाही खुलासा आर माधवनने केला आहे. यामध्ये त्याने ब्रेक घ्या आणि श्वास घ्या असा सल्ला दिला. याला बॉक्स ब्रिदिंग असं म्हणतात. एका ठराविक वेळेत श्वास घ्या, तो रोखा आणि नंतर सोडून द्या. काही वेळ ही प्रक्रिया अशीच करा. ही लयबद्ध श्वासोच्छवासाची पद्धत विश्रांतीला प्रोत्साहन देते आणि तणावात असणाऱ्या मनाला शांत करण्यास मदत करते. यामुळे तुमच्या विचारात स्पष्टता येईल. 


तणावानंतर येणाऱ्या शांततेचा आदर करा


आर माधवनने यावेळी तुमच्याकडे जर तणाव असेल तर यानंतर येणाऱ्या शांततेचा आदर करा असा सल्लाही दिला. आयुष्यात जर तणाव असेल तर त्याचाही थोडा आनंद घ्या. कारण तो तणाव काही वेळाने जाणार आहे. त्यामुळे उगाच आपला रक्तदाब वाढवू नका. कधीतरी तो कमी होणारच आहे असं आर माधवनने सांगितलं आहे. 


आनंद देईल अशा गोष्टी करा


तसंच तुम्हाला आनंद देईल अशा गोष्टी करा. कुत्र्यासोबत खेळा, तो जसे आहात तसेच तुमच्यावर प्रेम करतात असंही आऱ माधवनने सांगितलं. 


माझ्या मुलांचं भविष्य, आई-वडिलांची प्रकृती, कार्यक्रमांना उशीर होणं, ट्राफिकमध्ये अडकणं अशा अनेक गोष्टींमुळे आपल्याला तणाव येतो असा खुलासाही आर माधवनने केला.