मुंबई : क्रिकेट आणि बॉलिवूड विश्वाचं नातं हे जितकं जुनं तितकेच त्याचे पैलूही अनेक. अशा या सुरेख नात्याचा आणखी एक पैलू नुकताच पाहायला मिळाला. क्रिकेटपटू शिखर धवन याने सोशल मीडियाव पोस्ट केलेल्या व्हिडिओत याचीच झलक पाहायला मिळत आहे. मुख्य म्हणजे शिखरसोबत या व्हिडिओमध्ये बी- टाऊनचा हरहुन्नरी अभिनेता रणवीर सिंगही झळकत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ अधिकच मनोरंजक ठरत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये रणवीर आणि शिखर 'पद्मावत' या चित्रपटातील 'खली बली' या गाण्यावर ठेका धरताना दिसत आहेत. ज्यामध्ये या दोघांचाही अंदाज पाहण्याजोगा आहे. खली बली या अतिशय लोकप्रिय अशा गाण्याची गाजलेली स्टेप करताना हे दोघंही दिसत आहेत. 


शिखरनेच रणवीरच्या अंदाजात नृत्य केलं असं तुम्हाला वाटत असेल, तर तसं नाही. रणबीरनेही क्रिकेटमधील या गब्बरप्रमाणे त्याच्याच अंदाजात एक स्टेप केली आहे. यावेळी रणवीर आणि शिखरच्या चेहऱ्यावरील आनंदही पाहण्याजोगा आहे. 



'खूब जमेगा रंग, जब गब्बर और खिल्जी संग', असं कॅप्शन लिहित शिखरने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्याला असंख्य व्ह्यूज मिळाले असून, कमेंट बॉक्समध्येही या दोघांवर चाहत्यांनी कौतुकाचा आणि प्रेमाचा वर्षाव केल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्य म्हणजे एकत्र येत या दोघांचा अंदाज पाहणं अनेकांसाठी परवणीच ठरत आहे.