मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग यानं (Ranveer Singh) त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत कायमच चाहत्यांची वाहवा मिळवली आहे. अतिशय कमी वयात आणि कमी वेळात रणवीरनं चाहत्यांच्या मनावर राज्य करण्याची किमया केली. त्याच्या नावावरच चित्रपटांची लोकप्रियता ठरु लागली. (Ranveer Singh)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री दीपिका पदुकोण हिच्याशी रणवीरनं प्रेमाचं नातं जपलं आणि पुढे ही जोडी विवाहबंधनात अडकली. 


रणवीर आणि दीपिकानं कायम एकमेकांवर असणारं प्रेम व्यक्त केलं. यशापयशात एकमेकांची साथही दिली. पण, आता या नात्यात एका अशाच व्यक्तीचं नाव पुढे येत आहे, जिची करामत दीपिकाच्याही भुवया उंचावेल. 


मुद्दा असा की ही तिची करामत आहे, की रणवीरची नाकी नऊ आणणारी सवय हे मात्रु तुम्हीच ठरवा. 


रणवीरला बिना कपडे पाहणारी ही अभिनेत्री कोण? 
सध्या रणवीरच्या नावाचा उल्लेख एका अभिनेत्रीच्या नावासोबत होताना दिसत आहे. ही अभिनेत्री म्हणे त्याच्या एका सवयीमुळे अडचणीत आली आहे. 


ती इतकी वैतागली आहे, की त्याच्या व्हॅनिटी वॅनमध्ये येणंही बंद केलं आहे. रणवीरच्या व्हॅनिटी वॅनमध्ये न जाण्याचा निर्णय घेणारी ही अभिनेत्री आहे, परिणीती चोप्रा. 


 'लेडीज वर्सेज रिक्की बहल' चित्रपटातून पहिल्यांदाच रणवीरसोबत स्क्रीन शेअर करणारी परिणीती आपण कोणाच्याही मेकअप वॅनमय़ध्ये सहज जातो असं बिनधास्त सांगते. 


पण, रणवीरच्या वॅनमध्ये जाताना मात्र आपल्याला विचार करावा लागतो, हे मात्र ती सांगायला विसरत नाही. रणवीरला लोकांमध्ये पँट काढायला आवडते, असं सांगताना तिनं एक आठवणही शेअर केली. 


एकदा आपण मेकअप करत होतो, रणवीरही तिथंच होता... मागं वळून पाहते तर काय, त्यानं पँट काढली होती... असं परिणीती म्हणाली.