मुंबई : कलाविश्वात विविध विषयांवर आधारित चित्रपट साकारण्याला प्राधान्य दिलं जातं. अशातच आता रॅपर्सचं विश्वही रुपेरी पडद्यावर उलगडणार आहे. झोया अख्तर या चित्रपटाचं दिग्दर्शन करत असून अभिनेता रणवीर सिंग यात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. सध्या रणवीर या चित्रपटासाठीही बरीच मेहनत घेत असल्याचं दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील काही रॅपर्सची भेट घेणं असो किंवा मग एखाद्या रॅप कॉन्सर्टला हजेरी लावणं असो. रणवीर स्वत:च्या परिने शक्य ते सर्व प्रयत्न करत आपली भूमिका साकारताना दिसत आहे.


चित्रपटाच्याच निमित्ताने रणवीरने नुकतीच डिवाईन या रॅपरच्या कॉन्सर्टला हजेरी लावली होती. त्यावेली त्याचा उत्साह पाहण्याजोगा होता. 


रणवीर आणि त्याचा ओसंडून वाहणारा उत्साह याविषयी काही वेगळं सांगण्याची गरज नाही. या कॉन्सर्टमध्येही व्यासपीठावर असताना अचानकच तो मागे गेला आणि चाहत्यांना इशारा करत त्याने गर्दीतच उडी घेतली. 



रणवीरने उडी मारताच त्याला झेलण्यासाठी तयार असलेल्या चाहत्यांनी ही संधी सो़डली नाही. त्यावेळी डिवाईनच्या कॉन्सर्टमध्ये एकच कल्ला पाहायला मिळाला. 


सोशल मीडियावर हा व्हिडिओ बराच व्हायरलही झाला आहे.