मुंबई : ranveer singh, deepika padukone बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांनी २०१८ मधील नोव्हेंबर महिन्यात लग्नगाठ बांधली. साधारण सहा वर्षांच्या रिलेशनशिपनंतर या जोडीनं सहजीवनाच्या या नव्या प्रवासाची सुरुवात करण्याचं ठरवलं. अगदी तेव्हापासूनच दीप-वीर खऱ्या अर्थानं अनेकांसाठी पती- पत्नीच्या नात्याचे आदर्श प्रस्थापित करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीपिका आणि रणवीरला आजवर अनेक मुलाखतींमध्ये त्यांच्या नात्यातील या सुरेख वळणाचं नेमकं रहस्य काय असा प्रश्न अनेकदा विचारण्यात आला. फक्त रुपेरी पडद्यावरच नव्हे, तर खऱ्याखुऱ्या आयुष्यातही ही जोडी तितकीच सुपररहिट आहे. मुळात खऱ्या आयुष्यात दीपिकानं इतर अनेक जोडप्यांप्रमाणंच रणवीरला काही गोष्टींबाबतची सक्त ताकिद दिली आहे. त्यांच्या यशस्वी नात्याचं हेच रहस्य तर नाही, ना हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहे. 


अर्थात हा प्रश्न पडण्याचं कारण आहे दीपिकाने रणवीरला दिलेली ताकिद. एका मुलाखतीत रणवीरने खुलासा केला आहे की, दीपिकानं मला रात्रीच्या वेळी घराबाहेर थांबण्यास सक्त मनाई केली आहे. अगदीच जास्त उशीर झाल्यास मात्र यात सूट आहे. शिवाय घरातून न खाता निघू नये असंही तिचं ठाम मत, किंबहुना तिचा आग्रह. याव्यतिरिक्त अणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे कॉल मिस करु नये, असंही तिचं म्हणणं. 


 


पाहा : कौतुकास्पद! गर्भवती हरिणीला वाचवण्यासाठी जवानाची नदीत उडी


 


रणवीरला दीपिकाने बजावलेल्या या ताकिदवजा तीन महत्त्वाच्या गोष्टीच त्यांच्या नात्यात बऱ्याच अंशी सहजता आणत असणार यात शंका नाही. मुळात एका नात्यामध्ये योग्य समतोल राखत आपल्या प्रिय व्यक्तीसमवेत आयुष्य मनमुराद जगणं म्हणजे नेमकं काय असतं, हे रणवीर आणि दीपिकाने वेळोवेळी सिद्ध केलं आहे हेच खरं.