मुंबई : Coronavirus  कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं लक्षात येताच भारतातही लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. महाराष्ट्रात तो काही दिवस आधीच जाहीर करण्यात आला होता. सावधगिरीचा इशारा म्हणून घेतल्या जाणाऱ्या या सर्व निर्णयांमध्ये सेलिब्रिटी मंडळींचीही अनोखी साथ मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकिकडे काहींना होम क्वारंटाईन किंवा लॉकडाऊनच्या या काळात घरात इतका वेळ नेमकं काय करावं असा प्रश्न पडत असतानाच दुसरीकडे सेलिब्रिटी मंडळी मात्र या वेळेचा सदुपयोग करताना दिसत आहेत. त्यामुळे ही मंडळी या क्षणाला तुम्हालाही अशीच काही कामं करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे, असं म्हणाययला हरकत नाही. 


सध्या अभिनेता रितेश देशमुखही अशाच कामांमध्ये रमला आहे. सोशल मीडियावर आपल्या खास मित्राला म्हणजेच अजय देवगन याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी म्हणून रितेशने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्याने पोस्ट केलेल्या या टीक-टॉक व्हिडिओमध्ये तो चक्क भांडी घासताना दिसत आहे. 



 


'मौका मिलेगा तो हम दिखा देंगे....' अशा गाण्यावरचा त्याचा हा टीकटॉक व्हिडिओ पाहताना त्यात रितेशची पत्नी जेनेलियाही अगदी धमाल अंदाजात दिसत आहे. त्यामुळे आयसोलेशनच्या या काळात ही सेलिब्रिटी जोडी नकळत का असेना पण, सर्वांच्याच चेहऱ्यावर हसू आणत आहे हे खरं.