Wedding Anniversary : पाहा रितेशने `बायको`ला दिल्या हटके शुभेच्छा
पती, पत्नी आणि लग्नाचा वाढदिवस.....
मुंबई : सेलिब्रिटी वर्तुळात अनेक कलाकार हे त्यांच्या खासगी आयुष्यामुले कायमच चर्चेचा विषय ठरतात. चाहत्यांनाही सेलिब्रिटींच्या खासगी जीवनाविषयी कमालीची उत्सुकता आणि त्याहूनही जास्त कुतूहल असतं. अभिनेता रितेश देशमुख हासुदग्धा अशाच काही कलाकारांच्या यादीतील एक.
मुळचा मराठमोळा रितेश हा फरक्त मराठी चित्रपट जगतातच नव्हे, तर हिंदी चित्रपटांच्या विश्वातही तितकाच सक्रिय. बरं, सोशल मीडियावरही त्याचा अनोखा अंदाज कायमच पाहायला मिळतो. सध्याही तो अशाच अंदाजात दिसत आहे. पण, याची त्याला शिक्षाही होऊ शकते बरं.
का.... ? रितेशने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तो लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पत्नी आणि अभिनेत्री जेनेलिया हिया शुभेच्छा देताना दिसत आहे. अतिशय विनोदी अंदाजात रितेशने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये जेनेलिया मोठ्या कुतूहलाने रितेशला त्यांच्या लग्नातील फोटो दाखवत आहे, तर तो फोटो पाहून रितेशच्या चेहऱ्याचे भाव मात्र इतर सर्व नवरोबांप्रमाणेच दिसत आहेत.
पाहा : मनोहर जोशींची नात कलाविश्वात भलतीच चर्चेत
रितेशच्या चेहऱ्यावरचे भाव आणि त्याच क्षणाला वाजणारं गाणं पाहता, अरेरे..... आता याची काही खैर नाही असंच वाटत आहे. रितेस आणि जेनेलियाच्या या सहजीवनाच्या खोडकर आणि तितक्याच आनंददायी प्रवासानिमित्त चाहत्यांनीही या खऱ्याखुऱ्या सुपरहिट जोडीला शुभेच्छा दिल्या आहेत. रितेश आणि जेनेलिया या दोघांनीही कलाविश्वात आपल्या कारकिर्दीची सुरुवात करत बरीच वर्षे प्रेमाचं नातंही तितक्याच आपुलकीने जपलं. पुढे अनेक वर्षांच्या या नात्याला त्यांनी एका वळणावर नवं नाव देत लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला होता.