मनोहर जोशींची नात कलाविश्वात भलतीच चर्चेत

Feb 01, 2020, 08:42 AM IST
1/6

मनोहर जोशींची नात कलाविश्वात भलतीच चर्चेत

वेब सीरिजच्या माध्यमाचा वापर करत आजवर अनेक कलाकारांनी त्यांच्या करिअरच्या नव्या आणि तितक्याच हव्याहव्याश्या वाटा निवडल्या आहेत. वेगळ्या धाटणीच्या नवनवीन कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याच्या याच माध्यमातून एक नवा चेहरा प्रेक्षकांच्या मनात आता घर करु लागला आहे. हा चेहरा आहे एका मराठमोळ्या अभिनेत्रीचा. 

2/6

मनोहर जोशींची नात कलाविश्वात भलतीच चर्चेत

ही अभिनेत्री म्हणजे शर्वरी वाघ. गेल्या काही दिवसांपासून शर्वरीचं नाव बरंच चर्चेत आहे. याला निमित्त ठरतंय ते म्हणजे The forgotten army ही वेब सीरिज. कबीर खान दिग्दर्शित या सीरिजला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. त्यातच शर्वरीचा चेहराही अनेकांच्या मनात घर करुन जात आहे. 

3/6

मनोहर जोशींची नात कलाविश्वात भलतीच चर्चेत

शर्वरी येत्या काळात चित्रपटांतूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण, तुम्हाला माहितीये का आपल्या निखळ हास्याने आणि सौंदर्याने अनेकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या या अभिनेत्रीचं महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातील एका महत्त्वाच्या व्यक्तीशी तितकंच महत्त्वाचं नातं आहे. 

4/6

मनोहर जोशींची नात कलाविश्वात भलतीच चर्चेत

ज्येष्ठ शिवसेना नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी हे शर्वरीचे आजोबा. मनोहर जोशी यांची मुलगी नम्रता वाघ, यांचीच शर्वरी ही कन्या. तिच्या वडिलांचं नाव, शैलेश वाघ. 

5/6

मनोहर जोशींची नात कलाविश्वात भलतीच चर्चेत

हिंदी कलाविश्वात असं रातकीय वर्तुळातील व्यक्तीशी थेट नातं असणारं हे आणखी एक नातं काहींना थक्क करुन जात आहे. 

6/6

मनोहर जोशींची नात कलाविश्वात भलतीच चर्चेत

शर्वरी येत्या काळात 'बंटी और बब्ली २' या चित्रपटातून झळकणार आहे. ज्यामध्ये ती अभिनेता सिद्धार्थ चतुर्वेदी याच्यासोबत झळकणार आहे. यशराज फिल्मस या निर्मिती संस्थेअंतर्गत हा चित्रपट साकारला जाणार आहे. (सर्व छायाचित्रे- इन्स्टाग्राम/ शर्वरी वाघ)