...आणि चाहत्यांच्या घोळक्यात सलमान भडकला
सलमानचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
मुंबई : बॉलिवूड 'दबंग' सलमान खान सध्या त्याच्या आगामी 'दबंग ३' चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये व्यग्र आहे. सोशल मीडियावर त्याचे अनेक ऑफ स्क्रिन व्हिडिओ समोर येत असतात. सलमानचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात सलमान त्याच्या चाहत्याशी गैरवर्तन करताना दिसत आहे.
सलमानची फॅन फॉलोइंग बरीच मोठी आहे. त्याची एक झलक पाहण्यासाठी अनेक चाहते गर्दी करताना पाहायला मिळतात. असाच चाहत्यांच्या घोळक्यातील सलमानचा टिकटॉक व्हिडिओ समोर आला आहे.
बीइंग स्ट्राँग फिटनेस इक्विपमेंटच्या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी सलमानची खास उपस्थिती होती. तेथे त्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. या गर्दीमुळे सलमानला बाहेर पडणंही कठिण झालं होतं. याचवेळी एक मुलगा सलमानसोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करु लागला. त्याचदरम्यान सलमानने त्याला धक्का दिल्याचं व्हिडिओत कैद झालं. या व्हिडिओवर सोशल मीडियाच्या माध्यमातून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या.