मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या सेलिब्रिटींच्या लग्नाच्या जोरदार चर्चा सुरु आहेत. अशातच सलमान खान कधी लग्न करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. लग्नाची तारिख जाणून घेण्यासाठी संपुर्ण सिनेसृष्टी आणि त्याचा चाहतावर्ग उत्सुक आहे. मात्र यावेळी सलमानने ही ईच्छा चाहत्यांची पुर्ण केली आहे. स्वत: सलमान खानने त्याच्या लग्नाची तारीख घोषित केली आहे. मात्र मुद्दा इतकाच आहे की सलमान खानने तारीख आणि महिना सांगितला आहे. पण वर्षाचा उल्लेख केला नाही...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्षानुवर्षे आपला एकटेपणा आणि लग्नाचे प्रश्न टाळणाऱ्या सलमान खानला भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाने हाच प्रश्न विचारला होता तेव्हा तो बुचकळ्यात पडला. सानिया मिर्झाने हा प्रश्न सलमान खानला विचारला तेव्हा सानियाच्या आत्मचरित्र 'ऐस अगेन्स्ट ऑड्स'च्या लाँच सोहळ्याला अभिनेता उपस्थित राहिला होता.


एका वृत्तानुसार, सलमान खानने सांगितलं की, १८ नोव्हेंबर  मात्र माहिती नाही कुठच्या वर्षी होईल. पण होईल एवढं नक्की.'' म्हटलं जातं की, गेले काहि वर्ष सलमान रोमानियन मॉडल इयूलिया वंतूरला डेट करत आहे. खरंतर सलमानचे आई-वडिल सलीम खान आणि सलमा खानचं लग्न १८ नोव्हेंबरला झालं.   आणि सलमान खानची धाकटी बहीण अर्पितानेही सुमारे दोन वर्षांपूर्वी (वर्ष २०१४) याच दिवशी आयुष शर्मासोबत लग्न केलं होतं.


सलमान खानचं हे विधान ऐकून सानिया मिर्झा हसली आणि म्हणाली की, तिच्या एकट्याने जास्त मुलींची तक्रार होणार नाही, तेव्हा सलमानने लगेच उत्तर दिलं, "मी काही महिलांना ओळखतो ज्यांच्या तक्रारी आहेत... तुम्हाला माहित नाही, किती दबाव आहे. मी माझ्या आई आणि बहिणीबद्दल बोलत आहे त्यांना वाटतं मी लग्न करावं...''



हे लक्षात घेण्यासारखे आहे की सलमान खान अनेकदा त्याची कथित गर्लफ्रेंड युलियासोबत दिसतो, काही काळ अफवांची पर्वा न करता हे दोघं अनेकदा एकत्रही दिसले आहेत. आज जरी सलमानचे चाहते खरचं त्याच्या लग्नासाठी उत्सुक असले तरी, आम्ही तुम्हाला सांगतो की, सलमानने हे वक्तव्य खूप आधी केलं आहे. त्यामुळे सलमान खरोखर कधी लग्न करतोय हे पाहण औत्सुक्याचं ठरणार आहे.