महाराष्ट्रात उटीचा फिल! रत्नागिरी कोल्हापूरला जोडणारा आंबा घाट; थंड हवेचे हिल स्टेशन

आंबा घाटातून प्रवास करताना प्रवासी हरखून जातात. या घाटातील निसर्ग सौैंदर्य लक्ष वेधून घेते. 

| Jun 01, 2024, 23:34 PM IST

Ratnagiri Kolhapur Amba Ghat :  आंबा घाट महाराष्ट्रातील सर्वात सुंदर घाटरस्ता आहे. आंबा घाट हा रत्नागिरी कोल्हापूर या दोन जिल्ह्यांना जोडतो. डोंगरमधून जाणारा हा रस्ता अतिशय सुंदर आणि निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. रत्नागिरी कोल्हापूर हा चार तासांचा प्रवास आंबाघाटामुळे आल्हाददायी बनतो. 

1/7

उटी म्हंटल की डोळ्यासमोर येते हिरव्यागार गर्दी झाडीतून जाणारा नगमोडी रस्ता. सेम टू सेम असाच रस्ता आपल्या महाराष्ट्रात आहे. या मार्गावरुन प्रवास करताना उटीचा फिल येतो.   

2/7

आंबा हे ठिकाण कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर कोल्हापूरपासून सुमारे 65 किमी आणि रत्नागिरीपासून सुमारे 60 किमी अंतरावर आहे.

3/7

पावासाळ्यात आंबा घाटचे सौंदर्य अधित खुलून दिसते. घाचत सगळीकडे दाट धुके दिसते. 

4/7

आंबा घाट हे लोकप्रिय हिल स्टेशन देखील आहे. आंबा घाटातील अनेक गावांमध्ये पर्यटक थांबातात आणि येथील निसर्गसौंदर्यचाा आनंद लुटतात. मात्र, आंबा गाव सर्वात लोकप्रिय आहे. 

5/7

आंबा घाट हा समुद्रसपाटीपासून 2000 हजार फूट उंचीवर आहे.  हे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात उंच ठिकाण आहे.

6/7

आंबा घाट हा अतिशय सुंदर आहे. हिरवेगार डोंगर रस्त्याच्या भोवताली खोल दरी. यामुळे घाटात नेमही धुकं असत. यामुळे आंबा घाटातून प्रवास करताना प्रवाशी हमखास घाटात थांबून फोटो काढतात.

7/7

पश्चिम घाटामध्ये रत्नागिरी कोल्हापूरला जोडणाऱ्या आंबा घाटातून प्रवास करताना उटी मसुरी रोडचा फिल येतो.