मुंबई : म्हातारपण हे प्रत्येकालाच हवं असतं असं नाही. पण, ही एक अशी बाब आहे जी टाळता येत नाही. पण, म्हातारपणाचंही आपलं असं वेगळं सौंदर्य आणि विश्व असतं, हेसुद्धा तितकच खरं. अभिनेता सलमान खान याने सोशल मीडियावर नुकताच पोस्ट केलेल्या एक फोटो पाहून सहज याचा अंदाज लावता येत आहे. भाईजान सलमानने नुकतच त्याच्या 'भारत' Bharat या आगामी चित्रपटाचा नवा पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. या पोस्टरमध्ये त्याचं वयोवृद्ध रुप पाहायला मिळत आहे. सलमानने शेअर केलेल्या या पोस्टरला अनेकांचीच पसंती मिळत असून, अवघ्या काही क्षणांत त्याचा हा अंदाजही व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'जितने सफेद बाल मेरे सर और दाढी मे हैं, उससे कहीं ज्यादा रंगीन मेरी जिंदगी रही हैं!', असं कॅप्शन देत त्याने #Bharat असा हॅशटॅगही जोडला आहे. वयोवृद्ध व्यक्ती, काहीशा पांढऱ्या दाढी- मिश्या, चष्मा आणि कोणा एका गोष्टीवर रोखलेली, शून्यात गेलेली नजर असा एकंदर त्याचा लूक चित्रपटाच्या पोस्टरवर पाहायला मिळत आहे. 


'भारत'च्या पोस्टरवर '२०१०' या वर्षाचाही ठळक उल्लेख पाहायला मिळतो. सलमानने यापूर्वीही भारतमधीच त्याचे काही लूक प्रेश्रकांच्या भेटीला आणले होते. पण, त्याचं हे रुप मात्र गुलदस्त्यातचट ठेवण्यात आलं होतं. अली अब्बास जफर दिग्दर्शित या चित्रपटातून गतकाळातील कथानक साकारण्यात येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये आतापासूनच या चित्रपटाची उत्सुकता पाहायला मिळत आहे. 



'जर्नी ऑफ अ मॅन ऍण्ड अ नेशन टुगेदर' म्हणजेच एक व्यक्ती आणि एका देशाचा प्रवास... असं या पोस्टरवर लिहिण्यात आलं आहे. चित्रपटाच्या नावाचा आणि या ओळीचा संदर्भ लावल्यास बऱ्याच गोष्टी लक्षात येत आहेत. ईदच्या मुहूर्तावर म्हणजेच ५ जूनला भाईजान सलमान 'भारत'च्या रुपाने चाहत्यांना ईदी देणार आहे. त्यामुळे आता ही ईदी चाहत्यांना भावणार का, हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे.