मुंबई : सलमान खानने दोन रात्री जोधपूरच्या जेलमध्ये काढल्यानंतर आता तो मुंबईत परतला असून पुन्हा आपल्या शेड्यूल्डमध्ये बिढी झालाय. सलमान परत येताच रेस ३चे दिग्दर्शक रेमो डिझूसा आणि निर्माता रमेश तौरानी खुश झालेत. मात्र कोर्टाच्या केसमुळे आता रेस ३ची उरलेली शूटिंग परदेशात करण्याऐवजी भारतातच केली जाणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलमान खानला काळवीट शिकार प्रकरणात जामीन मिळाला खरा मात्र तो काही अटींवर. जोधपूर सेशन्स कोर्टाकडून मिळालेल्या जामीनांतर्गत सलमान कोर्टाच्या परवानगीशिवाय देशाबाहेर जाऊ शकत नाही. यामुळे बॉलीवूड हंगामाच्या बातमीनुसार कायद्याच्या प्रक्रियेने जात परवानगी मिळवणे ही झंझट कमी कऱण्यासाठी दिग्दर्शक-निर्मात्याने ही शूटिंगच भारतात करण्याचा निर्णय घेतलाय. 



रेस सीरीजमधील तिसऱ्या सिनेमाचे शूटिंग सध्या परदेशात होतेय. या सिनेमात जबरदस्त अॅक्शन सीन्स पाहायला मिळणार आहेत. या सिनेमातील अॅक्शन सीन्ससाठी परदेशातील अनेक ठिकाणे निवडण्यात आली होती. सूत्रांच्या माहितीनुसार रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलंय की, जोधपूरच्या घटनेनंतर आता दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी परदेशाऐवजी भारतातच हे सीन्स शूट करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सलमान खान सध्या आपल्या कुटुंबाला अधिकाधिक वेळ कसा देता येईल याचा विचार करतोय.