मुंबई : अभिनेता सलमान खान याच्या कुटुंबाला सध्या काही अडचणींचा सामना करावा लागत आहे. कुटुंबातील काही मंडळी अडचणीमध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे. यामागं कारण ठरत आहे तो म्हणजे कोरोना. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनामुळं विस्कळीत झालेलं जनजीवन आता कुठे पूर्वपदावर येत असताना दिसलं, त्यातच पुन्हा एकदा एका नव्या व्हॅरिएंटनं सर्वांचीच चिंता वाढवली. 


अगदी सलमानही यापासून वेगळा राहू शकलेला नाही. सूत्रांच्या माहितीनुसार दरवर्षी अतिशय धामधुमीत वाढदिवस साजरा करणारा सलमान यंदाच्या वर्षी मात्र असं काहीही करताना दिसणार नाही. 


मुंबईत कोरोना हाताबाहेर जाण्यास उशीर लागणार नाही, असं चित्र सध्या दिसत आहे. त्याचप्रमाणे नव्या व्हॅरिएंटचा प्रसारही वेगानं होत असल्याचे निष्कर्ष समोर आले आहेत. 


परिणामी सलमाननं कोणताही धोका पत्करण्याची तयारी सध्या दाखवलेली नाही. (Salman khan Birthday)


तो फक्त कुटुंब आणि काही खास मित्रांच्या साथीनं पनवेलस्थित फार्महाऊसवरच वाढदिवस साजरा करणार असल्याचं कळत आहे. 


वाढदिवसाच्या निमित्तानं तो फार कमी लोकांना बोलवणार असल्याची माहिती समोर येत आहे. 


सहसा सलमानच्या वाढदिवसाला सेलिब्रिटी मित्रांची गर्दी असते, पण यंदा मात्र परिस्थिती आणि चित्र वेगळं आहे. 


कोणतंही मोठं सेलिब्रेशन नाही, गर्दी तर नाहीच नाही अशाच मनस्थितीमध्ये तो सध्या दिसत आहे. 


Salman Khanच्या भव्य घरात राहण्याचं स्वप्न पाहातायं, द्यावं लागेल एवढं भाडं


 


काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री करीना कपूर हिला कोरोनाची लागण झाली होती. ज्यानंतर अमृता अरोरा, माहीप कपूर यांनाही कोरोनानं विळखा घातला. 


बॉलिवूड कलाकारांचं हे पार्टी प्रकरण सध्या बऱ्याच कारणांमुळे चर्चेत आलं. त्यातच बऱ्याचजणांना कोरोनानं ग्रासल्यामुळं ही पार्टी कितपत योग्य होती, हाच प्रश्न आता उपस्थित राहत आहे.