मुंबई : काही दिवसांपूर्वीच अभिनेता संजय दत्त sanjay dutt  याचा फुफ्फुसांचा कर्करोग झाल्याचं निदान झालं. सोशल मीडिच्याच्या माध्यमातून ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. ज्यानंतर खुद्द संजुबाबानं एक पोस्ट लिहित आपण कामाच्या व्यापातून काही काळासाठी विश्रांती घेणार असल्याचं चाहत्यांना आणि सर्वांनाच सांगितलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॅन्सरचं निदान झाल्यानंतर संजय दत्तवर तातडीनं उपचार सुरु करण्यात आले. त्याच्या केमोथेरेपीचं पहिलं सत्र पूर्णही झाल्याची माहिती समोर येत आहे. ज्यानंतरसआता संजय दत्त कलेवरील त्याचं प्रेम आणि कामाप्रती असणारी समर्पकता यांच्यापोटी एका महत्त्वाच्या निर्णय़ावर पोहोचला आहे. 


आजारपणामुळं चित्रपटांची कामं अडू नयेत यासाठी आता त्यानं चित्रीकरण पुन्हा सुरु करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कॅन्सरशी संघर्ष सुरु असतानाच संजयचा हा निर्णय अनेकांना भुवया उंचावायला भाग पाडत आहे. तर, कित्येकजण त्याच्या पाठीवर थाप मारत आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार संजय दत्तनं फक्त हा निर्णयच घेतला नाही, तर तो चित्रीकरणासाठी चित्रपटाच्या सेटवरही पोहोचला होता. दोन दिवसांच्या चित्रीकरणानंतर तो पुन्हा एकदा उपचारांकडे वळणार असल्याची माहिती मिळाली आहे. 


कॅन्सरवरील उपचार सुरु असणाऱ्या संजय दत्तच्या पहिल्या केमोथेरेपीचं सत्र नुकतंच पूर्ण झालं आहे. येत्या काही दिवसांमध्ये त्याच्यावरील दुसऱ्या केमोथेरेपीचं सत्रहील सुरु होणार आहे. या आजारासाठी संजय दत्त नेमक्या किती केमोथेरेपी घेणार हे मात्र अद्यापही स्पष्ट होऊ शकलेलं नाही. 


 


दरम्यान, या आजारावरील उपचारासाठी संजय दत्तनं अमेरिकेत जाण्याचा विचार केला होता. यासाठीची प्रक्रियाही सुरु झाली होती. पण, कालांतरानं निर्णय़ बदलून त्याच्यावर मुंबईतच उपचार करण्याचा निर्णय झाला. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पाहता त्यामुळं उदभवलेली परिस्थिती यास कारणीभूत असल्याचं कळत आहे.