मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याने पुन्हा एकदा Coronavirus कोरोनाविरोधातील या लढाईमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण असं योगदान दिलं आहे. सोमवारी शाहरुखने कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या डॉक्चरांसाठी, आरोग्य सेवांमधील कर्मचाऱ्यांसाठी जवळपास २५ हजार पीपीई किट्सची सोय करुन दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रातील आरोग्य सेवांमधील या कोरोना वॉरियर्ससाठी पुढे सरसावत किंग खानने केलेली ही मदत सध्या अनेकांची मनं जिंकत आहे. खुद्द राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही शाहरुखच्या या मदतीमुळे आरोग्य सेवेत असणाऱ्यांना फायदा होणार असल्याचं म्हणत समाधान व्यक्त केलं. 


ट्विट करत टोचपे यांनी शाहरुखचे आभारही मानले. त्याच्या ट्विटला उत्तर देत कोरोनाच्या या लढ्यामध्ये सर्वजण एकजुटीने सामना करत असल्याची बाब अधोरेखित केली. शाहसरुखच्या मीर फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेकडून यापूर्वीच महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मदत जाहीर केली होती. ज्यानंतर आता पुन्हा एकदा तो मदतीसाठी पुढे सरसावला आहे. 



याशिवाय शाहरुख आणि गौरी खान यांनी त्यांच्या कार्यालयातील काही भागही कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी देऊ केला होता. विविध माध्यमांतून किंग खान सध्या कोरोनाच्या या लढ्यात त्याचं महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. त्यामुळे रुपेरी पडदा गाजवणारा हा अभिनेता खऱ्या अर्थाने या कठिण प्रसंगात एका वेगळ्याच रुपात चाहत्यांची आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचीही मनं जिंकत आहे, असं म्हणायला हरकत नाही.