मुंबई : हिंदी कलाजगतामध्ये सध्या काही जोड्यांना चाहत्यांचं विशेष प्रेम मिळतं. अशा जोड्यांमध्ये अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी, मीरा राजपूत हिच्याही नावाचा समावेश आहे. (shahid kaoor mira rajput)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कलाविश्वातील कोणत्याही व्यक्तीशी संबंध नसताना शाहिदवर विश्वास ठेवत मीरानं त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अरेंन्ज्ड मॅरेज पद्धतीनं ही जोडी विवाहबंधनात अडकली. 


लग्नानंतर एकमेकांना ओळखण्यासाठी ते दोघंही पुरेसा वेळ देऊ पाहत होते. पण, त्यादरम्यानच असा प्रसंग घडला जेव्हा शाहिद आणि मीराच्या या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचं दिसून आलं. 


शाहिद आणि मीरामध्ये खरंच दुरावा निर्माण झालाय का? तुम्हालाही हादरा बसला हे ऐकून ? 


त्यांच्या नात्यात निर्माण झालेला हा दुरावा खराखुरा नाही, तर ही त्यांच्या लग्नानंतर लगेचच्याच दिवसांमध्ये घडलेली एक गोष्ट आहे. 


जेव्हा शाहिदसोबत मीरा 'कबीर सिंग' या चित्रपटाचं अर्ली कट वर्जन पाहण्यासाठी गेली होती. चित्रपट सुरु झाला तेव्हा ती त्याच्या अगदी जवळच बसली होती. 


पण, चित्रपटाचा मध्यान्न जेव्हा समोर आला, तेव्हा ती त्याच्यापासून जवळपास 5 फूट दूर गेली होती. एकतर ते arranged marriage , त्यात मीराचं असं वागणं शाहिदलाही कळेना. 


चित्रपट पाहिताना त्यावेळी तिचा शाहिदला पहिला प्रश्न होता, 'तू हा असाच आहेस का? तू असं करतोस का?'


तिच्या या प्रश्नांची उत्तरं देताना अगं नाही... तो तर टॉमी सिंग, माझ्याशी त्याचा काहीच संबंध नाही, अशा शब्दांत त्यानं तिची समजुत काढली. तो क्षण इतका आव्हानात्मक होता की आपण या माणसाशी लग्न करुन फसलो, अशाच भावनेनं मीराच्या मनात घर केलं होतं. 


पण, शाहिदनं तो प्रसंग निभावून नेला आणि पुढे हे नातं पुन्हा एकदा रुळावर आलं.