हे वागणं बरं नव्हं! Shahid Kapoor चा Attitude पाहून नेटकऱ्यांनी झाप झाप झापलं
Shahid Kapoor Lashes Out a Paparazzi: अभिनेता शाहिद कपूर सहसा त्याच्या मनमिळाऊ स्वभासाठी ओळखला जातो. पण, यावेळी मात्र तो असा का वागला हेच कुणाला कळेना.
Shahid Kapoor Lashes Out a Paparazzi: काही सेलिब्रिटी त्यांच्या कलाकृतींशिवाय आणखी एका कारणामुळं चर्चेत असतात अनेकांची मनं जिंकत असतात आणि कित्येकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असतात. अशाच सेलिब्रिटींमध्ये येणारं एक नाव म्हणजे अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor ) याचं. शाहिदनं कायमच त्याच्या मनमिळाऊ स्वभावानं चाहत्यांच्या मनाचा ठाव घेतला आहे. चेहख्यावर स्मितहास्य ठेवत समोरच्या व्यक्तीला भेटणं, त्यांच्याशी संवाद साधणं यासाठी तो ओळखला जातो. पण, यावेळी मात्र हाच अभिनेता त्याच्या काहीशा विचित्र आणि अनपेक्षित स्वभावामुळं अनेकांच्याच टिकेचा धनी झाला आहे.
शाहिदनं केलंय तरी काय? (Bollywood trending videos)
(New year) नव्या वर्षाच्या स्वागतासाठी परदेशात गेलेली सेलिब्रिटी मंडळी आता मायदेशी परतू लागली आहेत. शाहिद आणि त्याचं कुटुंब याच सेलिब्रिटींपैकी एक. नुकतच या अभिनेत्याला सहकुटुंब मुंबई विमानतळावर पाहिलं गेलं. त्यावेळी शाहिद आणि त्याची पत्नी, मीरा (Shahid Kapoor wife) या दोघांनीही छायाचित्रकारांपुढे पटापट पोझ दिल्या आणि ते कारमध्ये जाऊन बसले. पण, त्यानंतरच असं काही झालं की अभिनेत्याचा पारा चढला.
शाहिद पत्नीसह कारमध्ये बसलेला असतानाच काही paparazzi नी त्यांचे व्हिडीओ काढण्यास सुरुवात केली. काहींनी या जोडीचे फोटो काढले. याच कारमध्ये शाहिदची मुलंही होती. त्यामुळं छायाचित्रकारांनी तिथं गर्दी केली. हे पाहून शाहिदनं, 'क्यूं ले रहा है? वीडियो क्यूं ले रहा है?' असा संतप्त सवाल करत त्यानं डोळ्यातूनच या मंडळींना धाक दिला.
हेसुद्धा वाचा : Controversy : चितळेंची केतकी, पाटलांची गौतमी आणि जावेदांची उर्फी... या पोरींनी राजकारण्यांनाही केलंय परेशान
सोशल मीडियावर ट्रोलिंगचा शिकार (Shahid Kapoor viral video)
एकाएकी शाहिदचं असं संतापणं आणि जी मंडळी त्याच्यासाठी तिथं प्रतीक्षेत होती त्यांना अशी वागणूक देणं हे सर्व पाहून नेटकऱ्यांना त्याची चीड आली. 'त्याला कुणीतरी लक्षात आणून त्या की तो एक सेलिब्रिटी आहे, त्याच्या भोवती गर्दी असणारच...', 'इथे चित्रपट मिळेना आणि याची वागणूक पाहा....' 'अरे देवा... इतका गर्व...का?' अशा बोचऱ्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या. आता चाहते आणि नेटकऱ्यांचा ओढवलेला रोष पाहता शाहिद यावर नेमका कसा व्यक्त होतो ते पाहणं महत्त्वाचं ठरेल (shahid kapor movies).