रात्री उशिरा करण जोहरच्या पार्टीतून एकत्र निघत सिद्धार्थ- कियारा गेले तरी कुठे?
कुठे नात्यांची अधिकृत ग्वाही दिली जात होती, तर कुठे स्टाईल स्टेटमेंट सेट केले जात होते.
मुंबई : चित्रपट निर्माता- दिग्दर्शक करण जोहर याने नुकताच मुंबईच्या यशराज स्टुडिओमध्ये (Yash Raj Studios) त्याचा ५० वा वाढदिवस साजरा केला. करणच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कलाजगतातील त्याच्या बऱ्याच मित्रांनी या पार्टीला हजेरी लावली.
ही पार्टी काहीजणांसाठी खास होती, कारण कुठे नात्यांची अधिकृत ग्वाही दिली जात होती, तर कुठे स्टाईल स्टेटमेंट सेट केले जात होते.
अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी ही जोडीसुद्धा या पार्टीच्या निमित्तानं एकत्र दिसली. सिद्धार्थ आणि कियारा हे बर्थडे पार्टीला एकत्र आले नाहीत. पण, या दोघांना पार्टीतून एकत्रच निघताना अनेकांनीच पाहिलं. (Sidharth Malhotra Kiara Advani)
सिड आणि कियारा पार्टीतून एकाच कारमधून निघाले. रात्री उशिरा आता हे दोघं नेमके कुठं गेले यावरून पडदा उठलेला नाही. पण, एकिकडे त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरु असतानाच दुसरीकडे मात्र त्यांचं असं एकत्र वावरणं मात्र या अफवांना धुडकावून लावत आहे.
सोशल मीडियावरही कियारा आणि सिद्धार्थ पार्टीतून एकत्र निघतानाचे फोटो व्हायरल झाले. हे फोटो पाहताना चाहत्यांनीही त्यावर असंख्य कमेंट्स केल्या. 'प्रेम वगैरे म्हणतात ते हेच का....', 'त्यांचे डोळेच सर्वकाही बोलून जात आहेत...' अशाही कमेंट नेटकऱ्यांनी केल्या.
सर्वच चाहत्यांच्या मते सिड आणि कियाराचं ब्रेकअप झालेलं नाही, त्यांचे व्हायरल होणारे फोटो पाहून तुम्हाला काय वाटतं?