प्रेयसीच्या हट्टापायी बॉलिवूड अभिनेत्याने घेतला `हा` निर्णय
म्हणून त्याने हा निर्णय घेतल्याचं कळत आहे.
मुंबई: बॉलिवूड चित्रपट म्हटलं की त्यामध्ये गाणी, मध्यवर्ती भूमिकेत असणाऱ्या कलाकारांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री हे सारंकाही आलंच. गेल्या काही वर्षांपासून यामध्ये इंटिमेट आणि किसींग सीन म्हणजेच चुंबन दृश्यांचाही समावेश झाला आहे. प्रेक्षकांमध्येही या गोष्टींना वाव मिळत आहे. पण, बॉलिवूडमधीलच एका अभिनेत्याने याच दृश्यांविषयी आता एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
अभिनेता टायगर श्रॉफने सध्याच्या घडीला घेतलेला निर्णय हा अनेकांनाच थक्क करुन जात आहे.
रुपेरी पडद्यावर यापुढे किसींग सीन न करण्याची अट आता टायगरने चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांपुढे ठेवली आहे.
किसींग आणि इंटिमेट सीन न करण्याचा निर्णय टायगरने घेतला आहे.
सूत्रांचा हवाला देत एका संकेतस्थळाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार टायगरने हा निर्णय त्याच्या तथाकथित प्रेयसीमुळे म्हणजेच अभिनेत्री दिशा पटानी हिच्यामुळे घेतल्याचं कळत आहे.
आपला प्रियकर रुपेरी पडद्यावर कोणत्याच अभिनेत्रीशी इंटिमेट होऊ नये, असंच वाटत असल्यामुळे तिच्यासाठीच म्हणून टायगरने हा निर्णय घेतल्याचं कळत आहे. त्यामुळे आता या नो किसींग क्लॉजवर टायगर पुढेही ठाम राहतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.