`या` अभिनेत्रीशी अफेअर असल्याचं विकीच्या आईवडिलांना कळलं आणि....
जाणून घ्या पुढे नेमकं काय झालं....
मुंबई : हिंदी कलाविश्वात आपल्या अभिनयाच्या बळावर कारकिर्दीत वेगाने यश संपादन करणारा अभिनेता विकी कौशल हा गेल्या काही दिवसांपासून इतरही बहुविध कारणांनी चर्चेत आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता विकी कौशल तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनला आहे. सोबतच आता त्याच्या अफेअरच्या चर्चांनी जोर धरला आहे.
हरलीन सेठी हिच्यासोबचच्या नात्यात दुरावा आल्यानंतर विकी आता, म्हणे कतरिना कैफला डेट करत आहे. किंबहुना हरलीनशी असणाऱ्या नात्यात कतरिनामुळेच दुरावा आल्याचंही म्हटलं जात होतं. याविषयीच आता खुद्द विकीने महत्त्वाची गोष्ट उघडकीस आणली आहे.
एका कार्यक्रमादरम्यान दिलेल्या मुलाखतीत विकीने या अफेअरच्या चर्चांविषयी मौन सोडलं. शिवाय हे सारं प्रकरण कुटुंबीयांपर्यंत पोहोचताच त्यांची काय प्रतिक्रिया होती, याविषयीसुद्धा त्याने सांगितलं. ''मी एकदा सकाळी उठलो आणि वर्तमानपत्रांमध्ये माझ्या लिंक-अपची (अफेअरची) बातमी होती. माझे आई-वडिल तिथेच डायनिंग टेबलवर बसले होते. मी ते वर्तमानपत्र कधी वाचण्यासाठी घेतो, याचीच ते वाट पाहात होते. ज्याक्षणी मी वर्तमानपत्र हातात घेतलं आणि त्यांच्याकडे वळलो तेव्हा ते जोरजोरात हसत होते. तेव्हाच बाबा म्हणाले, ज्या वेगाने तू पुढे जात आहेस, त्याची किमान आम्हाला तरी थोडी माहिती रे..... यावर मी त्यांना म्हटलं की मलासुद्धा याबद्दल काहीच माहित नाही,'' असा किस्सा त्याने सांगितला.
रामायणाविषयीच्या सोप्या प्रश्नाचं उत्तर न दिल्यामुळे सोनाक्षी सिन्हा ट्रोल
कतरिनाशी अफेअरच्या चर्चांविषयी विकी म्हणाला, ''कतरिना आणि माझ्याबद्दलच्या अफवा गेल्या काही महिन्यांपासून सुरु आहेत आणि त्यानंतर पुढे तिच्या जागी आणखी एका मुलीचं नाव असेल.'' एकंदरच काय, तर या नात्याच्या अफवांना दुजोरा न देता हा ट्रेंड आता आपल्याला उमगला असल्याचं त्याच्या बोलण्यातून व्यक्त झालं.
खासगी आयुष्याला किमान सध्या प्राधान्य न देता विकी आयुष्याच्या प्रवासोबतच वाहत असल्याचं स्पष्ट होत आहे. येत्या काळात तो 'भूत' या थरारपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे तीन भाग असून पहिल्या भागात विकीच मुख्य भूमिकेत आहे. एका जहाजावर घडणाऱ्या अनपेक्षित घटनांवर आधारित या चित्रपटाची कथा बेतलेली आहे.