मुंबई :  अभिनेत्री Deepika Padukone दीपिका पदुकोण आणि अभिनेता विक्रांत मेसी यांच्या मुख्य भूमिका असणारा Chhapaak 'छपाक' हा चित्रपट पुढच्या वर्षीच्या सुरुवातीलाच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सध्याच्या घडीला या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी कलाकारांनी विविध कार्यक्रमांना हजेरी लावण्यासही सुरुवात केली आहे. पण या सत्राच्या सुरुवातीलाच त्यांना काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागले असल्याची बाब समोर येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्याच्या घडीला दिल्लीमध्ये सुरु असणारं एकंदर वातावरण आणि त्यामध्ये असणारी असंतोषाची लाट पाहता नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन सुरु असणाऱ्या या घडामोडींमुळे दीपिकाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 'छपाक' या आगामी चित्रपटाचं चित्रीकरण नवी दिल्लीत केलं जाणार नसल्याच्या निर्यणावर ती पोहोचली आहे. तेथे सुरु असणारी आंदोलनं, निदर्शनं आणि अशांततेतं वातावरण पाहता 'छपाक'ची संपूर्ण टीम आणि खुद्द दीपिका या निर्णयावर पोहोचली आहे. 


दीपिका आणि मेघना गुलजार यांच्याकडून ही माहिती देणारं अधिकृत पत्रक प्रसिद्ध करण्यात आलं. 'आमच्या मते ज्यावेळी शहर आणि देश एका भावनात्मकदृष्ट्या अस्थिर आणि अशांत वातावरणातून जात असतानात आगामी चित्रपटाची प्रसिद्धी करणं हा असंवेदनशीलपणा ठरेल. शांतता आणि सुसंवाद राखला जाईल अशी प्रार्थना करत आमच्या अनुपस्थितीमुळे उदभवणाऱ्या अडचणीसाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो', असं त्या पत्रकात म्हटलं गेलं होतं. 


Chhapaak trailer : वेदनांची दाहकता सांगणारा 'छपाक'चा ट्रेलर पाहाच



गेल्या काही दिवसांपासून, म्हणजेच नागरिकत्व सुधारणा कायदा देशात लागू करण्यात आल्यानंतर अनेक स्तरांतून त्याचे पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं. अनेक ठिकाणी गोंधळाचं वातावरण पाहता दिल्लीतील काही भागांमध्ये कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या मुद्द्यावरुन उसळलेला हा आगडोंब शमण्याकडेच साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.