Casting Couch : `माझ्यासोबत एक रात्र...`पासून `मसाज`पर्यंत; मराठमोळ्या अभिनेत्रीला हे काय दिवस पाहावे लागले?
Casting Couch चा सामना तिनंही केला. हिंदी चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये ती गाजली, पण वखवखलेल्या त्या नजरांपासून तिलाही वाचता आलं नव्हतं...
Casting Couch : अभिनय क्षेत्रातला झगमगाट कायमच सर्वांचे डोळे दिपवतो. कलाकारांच्या भोवती असणारी माध्यमांची गर्दी, चाहत्यांचा गराडा, सातत्यानं मिळणारं प्रेम, Attention, अमाप पैसा.... किती भन्नाट आयुष्य जगतात ना ही मंडळी, असं सर्वसामान्य चाहते ओघाओघात बोलून जातात. पण, रुपेरी पडद्याच्या या झगमगाटामागे नेमकं किती काळवंडलेलं विश्व आहे याची फार क्वचितांनाच कल्पना. याच दुहेरी चेहरा असणाऱ्या जगतामध्ये नशीब आजमावण्यासाठी आलेल्या एका मराठमोळ्या अभिनेत्रीनंही हे दाहक वास्तव अनुभवलं.
(Parched) 'पार्च्ड'मध्ये बोल्ज सीन साकारणं असो, किंवा मग 'शोर इन द सिटी', 'मांझी द माउंटमॅन', 'बदलापुर' मधील भूमिका असो, या अभिनेत्रीनं तिचं वेगळेपण सिद्ध करत चौकटीबद्ध पात्रांना शह दिला आणि आपली ओळख तयार केली. एव्हाना तुम्हालाही तिचं नाव लक्षात आलं असेल. (Bollywood News)
ही अभिनेत्री आहे राधिका आपटे (Radhika Apte ). राधिकानं काही मुलाखतींमध्ये ही बाब स्पष्ट केली आहे, की तिनं Casting couch चा सामना केला नाही, पण तत्सम परिस्थिती मात्र अनुभवली आहे. आपल्याला एक फोन आला होता, जिथं अमुक एक व्यक्ती चित्रपट साकारत आहे, तूसुद्धा त्याला संपर्क करु शकतेस, भेटू शकतेस फक्त तुला त्याच्यासोबत एक रात्र घालवावी लागेल; असं तिला फोन करणाऱ्या व्यक्तीनं सांगितलेलं. (Bollywood Actres Radhika Apte Birthday once she talked about casting couch )
एकदा परदेशी चित्रपटाची ऑफर आली, तेव्हा राधिका पाठीच्या दुखण्यानं त्रस्त होती. त्याचवेळी एक व्यक्ती तिच्याजवळ आला आणि त्यानं 'तू मला कधीही बोलवू शकतेस. मी तुला मसाज देईन' असं म्हटलं. आपल्याहून वयानं मोठ्या असणाऱ्या त्या इसमाचे शब्द ऐकून राधिका स्तब्ध झाली. ती तडक तिच्या खोलीतच निघून गेली होती.
वाचा : अभिनेत्री राधिका आपटेचं मोठं वक्तव्य म्हणाली, या कारणामुळे नाही लग्नाचा एकही फोटो
सध्या राधिका बरीच प्रसिद्ध आहे, तिला कलाजगतात चांगलं स्थान मिळालं आहे, पण त्या वखवखलेल्या नजरांपासून तीसुद्धा दूर राहू शकली नाही, हेच दुर्दैव.