मुंबई : बच्चन कुटुंबीयांवर कायमच माध्यमांच्या नजरास खिळलेल्या असतात. मुख्य म्हणजे या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची एक झलक टीपण्यासाठी कायमच छायाचित्रकारांची झुंबड उडते. बिग बी अमिताभ बच्चन यांची नात, आराध्याही याला अपवाद नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आई, ऐश्वर्या राय बच्चन हिच्यासोबत बऱ्याच कार्यक्रमांना हजेरी लावणाऱ्या आराध्याने काही दिवसांपूर्वीच दसऱ्याच्या पूजेच्या निमित्ताने एका ठिकाणी हजेरी लावली होती. ज्यानंतर तिच्या फोटोंची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली.


सफेद रंगाचा कुरता, भगव्य़ा रंगाचा चुडीदार आणि त्याच रंगाची लेहरिया ओढणी असा एकंदर आराध्याचा लूक होता. आराध्याला या रुपात पाहिल्यानंतर चहत्यांना लगेचच चित्रपटातील एका पात्राची आठवण झाली. ते पात्र म्हणजे 'कुछ कुछ होता है' या चित्रपटातील अंजली, अर्थातच काजोल. 


'आराध्या अगदी अंजलीसारखी दिसत आहे.....' अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी देण्यास सुरुवात केली. कोणी तिची तुलना या चित्रपटातील छोट्या 'अंजली'शी केली. तर कोणी, तिची तुलना मोठ्या अंजलीशी म्हणजेच काजोलशी दिली. एकंदरच प्रेक्षकांनी आराध्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा या चित्रपटाच्या आठवणी जागवल्या. मुळात या चित्रपटाची लोकप्रियता पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधून गेली हेसुद्धा तितकंच खरं. 



सध्याच्या घडीला आराध्या तिच्या कुटुंबीयांसमवेत जास्त दिसते. पण, माध्यमांसमोर आल्यानंतर सर्वांप्रती असणारं तिचं वागण आणि वावर सर्वांची मनं जिंकून जातो हेसुद्धा तितकंच खरं.