Alia Bhatt Childhood Photo: परेश रावल यांच्यासोबत दिसणारी ही लहान क्यूट मुलगी बॉलीवूडमध्येच नाही तर हॉलीवूडमध्येही आपल्या अभिनयाने सगळ्यांना घायाळ करते आहे. आपल्या क्यूटनेसने चाहत्यांना वेड लावणारी अभिनेत्री दुसरी कोणी नसून आलिया भट्ट आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वयाच्या 29 व्या वर्षी या अभिनेत्रीने तिचे अनेक हिट चित्रपट दिले आहेत. लहान वयातच चाहत्यांच्या आणि स्टार्सच्या हृदयात ठसा उमटवणारी ही अभिनेत्री लवकरच आई देखील होणार आहे. तिच्या बेबी बंपचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. ही अभिनेत्री कपूर कुटुबिंयाची लाडकी अभिनेत्री आहे. 


हा फोटो बघून अंदाज लावला जाऊ शकतो की आलिया भट्ट 5 वर्षांची असेल. आलियाचे बालपणीचे फोटो पाहणे चाहत्यांना खूप आवडते. त्याचबरोबर आलिया आणि रणबीरचे बाळही त्यांच्यासारखेच गोंडस असेल अशी आशाही चाहत्यांना आहेच आहे. 


'स्टुडंट ऑफ द इयर'मधून चित्रपटांमध्ये पदार्पण केल्यानंतर आलियाने स्वत:ला अक्षरक्षः सिद्ध केले आणि आज ती बॉलीवूडमधली सर्वात लोकप्रिय आणि यशस्वी अभिनेत्री आहे. 'टू स्टेट', 'राझी', 'गली बॉय', 'कलंक', 'बद्री की दुल्हनिया', 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया', 'गंगूबाई काठियावाडी', 'आरआरआर' यांसारख्या अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये ती दिसली आहे.



तिचे 'रॉकी आणि राणीची प्रेमकथा' आणि हॉलिवूड चित्रपट 'हार्ट ऑफ स्टोन' हे मोठे चित्रपट लवकरच येणार आहेत, तर तिचा आणि रणबीरचा 'ब्रह्मास्त्र' चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.