ती आली, तिने पाहिलं आणि... आलियाचं विचित्र रुप पाहून चाहत्यांना धक्का
आलिया तिच्या स्भावामुळंच अनेकांच्या रोषाचा सामना करताना दिसत आहे.
मुंबई : बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आलिया भट्ट ही तिच्या मनमिळाऊ स्वभावासाठी कायमच ओळखली जाते. पण, आता हिच आलिया तिच्या स्भावामुळंच अनेकांच्या रोषाचा सामना करताना दिसत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे सध्या आलियाची मोठ्या प्रमाणावर खिल्ली उडवली जात आहे.
सहसा आलिया फोटोग्राफर्सना टाळताना दिसत नाही. पण, यावेळी मात्र असं काही झालं की समोर फोटोग्राफर्स पाहून आलियानं त्यांना टाळलं आणि थेट ती पुढेच निघून गेली.
आलिया मॅम, आलिया मॅम असंच हे फोटोग्राफर्स तिला हाक मारत होते, पण तिने तडक लिफ्ट गाठली.
काही क्षणांनंतर आलियानं अवघ्या काही सेकंदांपुरताच मागे वळून पाहिलं आणि पुन्हा एकदा ती लिफ्टमध्ये निघून गेली.
रंगीबेरंगी अटायरमध्ये यावेळी काळ्या रंगाचे सनग्लासेस लावणारी आलिया झिमझिमणाऱ्या पावसाला इतकी घाबरली का, असाच प्रश्न चाहत्यांनी विचारला.
काहींनी आलियाचं हे वागणं खटकल्याचं स्पष्टपणे मांडलं, तर या बॉलिवूड अभिनेत्रीला इतका गर्व नेमका आला तरी का, असाही प्रश्न विचारला. चाहत्यांच्या या प्रतिक्रिया आलियापर्यंत आता पोहोचतात का आणि यावर ती नेमकी कशी व्यक्त होते हे पाहणं महत्त्वाचं असेल.
दरम्यान, सध्या आलिया तिच्या कामावर लक्ष देत आहे, शिवाय लग्नच्या तयारीतही डोकावताना दिसत आहे. अभिनेता रणबीर कपूर याच्यासोबतच्या अफेअरनंतर आता आलिया त्याच्याशीच विवाहबंधनात अडकणार आहे.