आलियाकडून लग्नमंडपात नवरदेवासमोरच कन्यादानाला विरोध ; पाहा पुढे काय झालं...
पाहा भर मंडपात आलियानं काय केलं...
मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा आता चाहत्यांसाठी नवीन नाहीत. आपल्या नात्याचा या दोघांनीही स्वीकार केला आहे. त्यामुळं आता कधी एकदा ही जोडी लग्नबंधनात अडकते असेच प्रश्न चाहत्यांकडून उपस्थित करण्यात येत आहेत. चाहत्यांच्या याच प्रश्नांचा भडीमार होत असतानाच आता आलियाच्या विवाहसोहळ्याचाच व्हिडीओ समोर आला आहे. (Bollywood actress alia-bhatts-new-ad-questioning-kanyadaan-receives-huge-flak watch video )
नववधूच्या रुपात आलिया नेमकी कशी दिसेल, असा प्रश्न जर तुमच्या मनात घर करत असेल तर त्याचं उत्तर आहे हा व्हिडीओ. जिथं लाल रंगाच्या लेहंग्यामध्ये आलिाचं सौंदर्य आणखी खुलून आलं आहे. चोकर नेकलेस, मांगटीका असा साज तिनं केल्याचं पाहायला दिसत आहे. सारंकाही सुरळीत सुरु असतानाच आणि लग्नविधी सुरु होतानाच आलिया काहीशी थांबून कन्यादानावरच प्रश्न उपस्थित करताना दिसते.
मुलगी परक्याची दौलत असते असं का म्हटलं जातं, वारंवार तिला तुझं खरं घर दुसरीकडेच आहे असं का म्हटलं जातं अशा अनेक प्रश्नांना आलिया वाचा फोडताना दिसते. तिचे हे प्रश्न ऐकून स्त्रीवादाचं हे कोणतं रुप असे नाराजी व्यक्त करणारे प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केले आहेत.
हा सारा घाट प्रत्यक्षात एका जाहिरातीसाठी घालण्यात आला आहे. डिझायनर लेहंगा आणि लग्नासाठीच्या कपड्यांच्या एका मोठ्या ब्रँडच्या जाहिरातीसाठी आलिया हे प्रश्न विचारताना दिसते. जाहिरातींच्या निमित्तानं अनेक नव्या संकल्पना पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळते. पण, इथं मात्र हे समीकरण जाहीरात पाहणाऱ्यांपैकी काहींना पटलं नसल्याचं कळत आहे. त्यामुळं यावरुन अनेकांनीच तिच्यावर निशाणा साधण्यास सुरुवात केल्याचं पाहायला मिळालं.
जाहिरातीला मिळणारी ही संमिश्र प्रतिक्रिया पाहता अद्यापही य़ावर आलिया मात्र व्यक्त झालेली नाही. दरम्यान, या जाहिरातीच्या निमित्तानं आलिया आणि रणबीरचं लग्न कधी होणार हा मुद्द्याचा प्रश्नही पुन्हा समोर आला. येत्या काळात आलिया एस.एस. राजामौली यांच्या - RRR या चित्रपटातून झळकणार आहे.