मुंबई : मनुष्याची शारीरिक रचना इतकी चमत्कारिक आहे, की त्याबद्दल लिहू किंवा विचार करु तितकं कमीच. त्यातही जेव्हा एखाद्या महिलेच्या शरीरात नव्यानं जीव आकारास येत असतो, तेव्हा त्याची कणाकणाने होणारी वाढ खूप काही सांगून जाते. अर्थात मातृत्त्व एका महिलेलाही नव्यानं जन्म देत असतं हेच खरं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका बॉलिवूड अभिनेत्रीनं नुकताच तिचा मातृत्त्वादरम्यानचा अनुभव शेअर केला आहे. जिथं ती गरोदरपणा, प्रसूतकाळ आणि त्या सर्व आठवणी, अनुभवांविषयी बोलताना दिसत आहे. 


इन्स्टाग्रामवरही या अभिनेत्रीनं तिच्या प्रसूतकाळादरम्यानचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती रुग्णालयातील स्ट्रेचरवर असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. 


प्रसूतकाळादरम्यानचे फोटो शेअर करणारी ही अभिनेत्री आहे, अमृता राव (Amrita Rao). अमृता आणि तिचा पती, अनमोल यांनी त्यांच्या प्रेमाच्या नात्याचा सुरेख प्रवास सर्वांसमोर आणला. या प्रवासातूनच त्यांनी काही आव्हानात्मक प्रसंगही सर्वांसमोर आणले. 


एखादं नातं म्हटलं की, त्या नात्यामध्ये येणारी आव्हानं आणि या आव्हानांचा मारा स्वीकारार्हच आहे. पण, प्रत्येक प्रसंगी तुम्हाला आपल्या माणसाची साथ असल्यास हा ही आव्हानंही सोपी वाटून जातात असंच अमृता आणि अनमोलनं युट्यूबवर शेअर केलेला व्हिडीओ पाहून लक्षात येत आहे. 



अमृतानं शेअर केलेला एक फोटो तर प्रचंड बोलका आहे, या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिल्यानुसार हा 'तोच क्षण आहे जेव्हा वीर जन्माला आला होता. जेव्हा शब्दही सुचेनासे झालेले. ही तिच नजर आहे', असं तिनं लिहिलं. 



पोस्ट केल्यानंतर काही क्षणांतच या सेलिब्रिटी जोडीच्या फोटोला कमाल पसंती मिळताना दिसत आहे. त्यांचा व्हिडीओसुद्धा चांगलीच व्ह्यूअरशिप मिळवताना दिसत आहे.