मुंबई : बॉलिवूड अभिनेते-अभिनेत्रींची सोशल मीडियावर अनेक फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत त्यांचे काही लहाणपणीचे फोटो देखील व्हायरल होत असतात. असाचं एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोतली बॉलिवूड अभिनेत्री तुम्हाला ओळखायची आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या लाडक्या अभिनेत्रीला ओळखता का ते पाहूया.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 काही स्टार्स त्यांच्या बालपणीच्या चित्रांमध्ये ओळखले जातात, तर काहींना त्यांना ओळखण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. असाच एक स्टार्सचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये इंडस्ट्रीतील एक  प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री तिच्या शाळेतला ग्रुप फोटोत आहे. ज्यामध्ये ती तिच्या वर्गमित्र आणि शिक्षकांसोबत दिसत आहे. शाळेच्या या ग्रुप फोटोमध्ये चाहते अभिनेत्रीला ओळखण्याचा प्रयत्न करत आहेत.


शालेय दिवसातील हा अभिनेत्रीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा एक ग्रुप फोटो आहे आणि अभिनेत्री खालून दुसऱ्या ओळीत बसली आहे. तुम्ही तिला ओळखले का? ओळखले नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की या ग्रुप फोटोमध्ये खालून तिसऱ्या ओळीत महिला शिक्षिकेच्या मागे उभी असलेली मुलगी दुसरी कोणी नसून बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना आहे. ट्विंकल खन्नाचा हा फोटो त्या दिवसांचा आहे जेव्हा ती शाळेत शिकत होती. ट्विंकल खन्ना तिच्या शाळेच्या दिवसात टॉम बॉय लूकमध्ये असायची.


ट्विंकल खन्नाने बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारसोबत लग्न केले आहे. ट्विंकल खन्नाला बॉलिवूडची दबंग अभिनेत्री देखील म्हटले जाते. याचे कारण म्हणजे ट्विंकल खन्ना कोणत्याही विषयावर आपले बेधडक मत व्यक्त करते.