मुंबई : सोशल मीडिया, कलाविश्व, चाहता वर्ग आणि इत्रतत्र सर्वत्र चर्चा होतेय ती म्हणजे सर्वांच्याच लाडक्या दीपिका पदुकोणा आणि रणवीर सिंग या सेलिब्रिटी जोडीची. दीपिका-रणवीरचं लग्न नेमकं कसं होणार इथपासून लग्नाची पत्रिका, पाहुण्यांची यादी, पदार्थांची मेजवानी इथपर्यंत प्रत्येक गोष्टीची माहिती समोर येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्नात आहेर किंवा कोणत्याही स्वरुपाची भेटवस्तू न स्वीकारण्याचा निर्णय घेणाऱ्या दीप-वीरच्या या स्वप्नवत दिवसाविषयी आणखी एक रंजक पण, तितकीच महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 


'पिंकव्हिला'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार बी-टाऊनच्या या लोकप्रिय जोडीने त्यांच्या लग्नाचा विमा उतरवला आहे. 


१२ नोव्हेंबर ते १६ नोव्बेंबर या दिवसांसाठीची विमा त्यांनी उतरवला आहे. 'ओरिएंटल इन्श्युरन्स' या कंपनीतर्फे हा विमा उतरवण्यात आल्याचं कळत आहे. 


‘ऑल रिस्क पॉलिसी’ अंतर्गत हा विमा घेण्यात आला असून,  त्या माध्यमातून विवाहसोहळ्याला संरक्षण देण्यात आलं आहे. 


विमानप्रवास, भूकंप, चोरी, पूर, वादळ, आग यामुळे लग्नात कोणताही अडथळा आल्यास या विम्याचं संरक्षण मिळणार असल्याचं कळत आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने हा विवाहसोहळाही दीपिका-रणवीरच्या चित्रपटांप्रमाणेच ब्लॉकबस्टर ठरत आहे, असंच म्हणावं लागेल.