मुंबई : अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांच्या नात्यात आता एक सुरेख वळण येणार आहे. जवळपास सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दीपिका आणि रणवीरने अखेर लग्नाचा निर्णय घेतला. अवघ्या काही दिवसांवरच त्यांचा हा स्वप्नवत विवाहसोहळा येऊन ठेपला असतानाच 'दीप-वीर' आता स्वप्न पाहत आहेत ते म्हणजे त्यांच्या सुरेख अशा घराचं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्नानंतर दीपिका आणि रणवीर हे दोघंही एका अशा घरात राहण्यास जाणार आहेत ज्याची किंमत जवळपास ७० कोटी रुपयांच्या जवळपास असल्याचं म्हटलं जात आहे. 


'बॉलिवूड हंगामा'च्या वृत्तानुसार लग्नानंतर दीपिका आणि रणवीर प्रभादेवी येथील एका आलिशान फ्लॅटमध्ये राहण्यास जाणार असून, येत्या काळात ते प्रशस्त घर घेण्याच्या तयारीत आहेत.


रणवीर आणि दीपिका हे दोघंही त्यांच्या करिअरच्या दृष्टीने बरेच आशावादी असून काम आणि खासगी आयुष्य या साऱ्यामध्ये समतोल राखणं हा त्यांचा मानस असणार आहे. 


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही सेलिब्रिटी जोडी मुंबईतील एका मोक्याच्या ठिकाणी जागा खरेद करण्यासाठी बेत आखत आहेत. घराच्या बाबतीत दीप-वीर कोणतीच तडजोड करण्याच्या तयारीत नसल्याचंही म्हटलं जात आहे. त्यामुळे आता येत्या काळात बी- टाऊनचे हे राम- लीला त्यांच्या स्वप्नांतील घर मिळवण्यात यशस्वी ठरणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.