Deepika Padukone and Ranveer Singh Wedding :  बॉलिवूडमधील 'पॉवर कपल' अशी ओळख असणाऱ्या अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग या जोडीनं कायमच त्यांच्या नात्याच्या माध्यमातून इतरांपुढं आदर्श ठेवला. मध्यंतरी मात्र या जोडीबद्दल बऱ्याच अफवांनाही वाव मिळाला. पण, तो काळही पाठीशी ठेवत ही जोडी पुढं आणि आता लग्नाच्या तब्बल 5 वर्षांनंतर दीपवीर एका अशा निर्णयावर पोहोचले ज्या निर्णयानं अनेकांच्याच भुवया उंचावल्या. मुळात ते असा काही निर्णय घेतील याची कोणाला पुसटशी कल्पनाही नव्हती. कारण, यावेळी काही निमित्तही नव्हतं आणि कोणता खास प्रसंगही नव्हता. 


रणवीर आणि दीपिकानं नेमका कोणता निर्णय घेतला? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बी टाऊनचं हे पॉवर कपल नेमकं कोणत्या निर्णयावर पोहोचलं ज्यामुळं बऱ्याचजणांच्या नजरा वळल्या? या निर्णयामुळं पाच वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं याचाही अंदाज चाहत्यांना आला. ज्यामुळं सध्या दीपिका आणि रणवीरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वारंवार पाहिला जात आहे. सुरुवात इतकी गंभीर झाली असली तरीही हा विषय मात्र तितका गंभीर नाही, हो पण तो तितकाच खास आहे हे मात्र खरं. कारण, या जोडीनं लग्नाला पाच वर्ष होत असतानाच त्यांचा Wedding Video चाहत्यांसमोर आणला आहे. 


सोशल मीडियामुळं चाहत्यांना पाहता आला दीपिका- रणवीरचा विवाहसोहळा 


2018 मध्ये दीपिका आणि रणवीरनं इटलीतील लेक कोमो या अतिशय सुरेख आणि निसर्गाच्या कुशीत असणाऱ्या एका ठिकाणी कोकणी आणि सिंधी अशा दोन्ही पद्धतींनी लग्नगाठ बांधली. साग्रसंगीत विवाहसोहळ्यामध्ये दोघांच्याही कुटुंबीयांसह खास मित्रमंडळींचा समावेश होता. या विवाहसोहळ्यातील काही क्षण यापूर्वीच दीप-वीरनं चाहत्यांच्या भेटीला आणले होते. अर्थात लग्नातील काही फोटो त्यांनी शेअर केले होते. त्यानंतर मात्र दीपिकानं एकाएकी तिच्या सर्वच सोशल मीडिया पोस्ट डिलीट केल्या आणि चाहत्यांना धक्का दिला. 


बरेच दिवस लोटले. इतके, की चाहत्यांना आता ही जोडी त्यांच्या लग्नाचा व्हिडीओ काही शेअर करत नाही असंच वाटू लागलं. पण, अखेर इथंही या दोघांनी चाहत्यांना थक्क करत लग्नाचा व्हिडीओ शेअर केला. 



हेसुद्धा वाचा : 'या' नावाजलेल्या कंपनीकडून महिला कर्मचाऱ्यांना Maternity Insurance Plan ची भेट 


जवळपास सहा वर्षांच्या रिलेशनशिपनंतर रणवीर आणि दीपिका लग्नाच्या निर्णयावर पोहोचले होते. तो दिलस या जोडीसाठी जितका खास होता तितकाच त्या दोघांच्या कुटुंबीयांसाठीही खास होता. व्हिडीओतील प्रत्येक क्षण हेच सांगून जातो. देवानं लिहिलेल्या अनेक कथांपैकी ही सर्वात सुरेख कथा आहे अशा शब्दात जिथं रणवीरचे वडील या नात्याबद्दलच्या भावना मांडताना दिसतात तिथंच रणवीरच्या रुपात आमच्या कुटुंबात उत्साहच आला असं दीपिकाचे वडील आनंदानं सांगतात. अशा या जोडीच्या लग्नाचा व्हिडीओ तुम्ही पाहिला का? इथं भावना आहेत, प्रेम आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कधीही न संपणारा एकमेकांवरील विश्वास आहे!!!