मुंबई : प्रत्येक महिलेसाठी मातृत्त्वं अतीव महत्त्वाचं असतं. हा तोच काळ असतो जेव्हा खऱ्या अर्थानं तिचा दुसरा जन्म होतो. जेव्हा तिच्या गर्भातून एक नवा जीव या जगात येतो. गरोदरपणापासून बाळंतपणापर्यंतचा काळ म्हणजे जणू एक परीक्षा. इथं अडचणी येतात, आव्हानंही येतात. फक्त खचून जायचं नसतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री दिया मिर्झानंही अशा परिस्थितीचा सामना केला. खासगी आयुष्यातील वादळं पेलत, त्यावर मात करत दिया पुढे आली आणि तिनं धाडस दाखवत काही निर्णय घेतले. (Bollywood Actress Dia Mirza once faced life threatning experience in her pergnnancy days)


2021 मध्ये तिनं बाळाला जन्म दिला. तिचं हे बाळ प्रसूतपूर्व काळात झालं होतं. ज्याबाबत दियानं नुकतेच काही खुलासे केले. बाळाच्या जन्मानंतर बाळासह तिचाही जीव धोक्यात आला होता. हल्लीच एका मुलाखतीत सांगताना तिनं गरोदरपणाच्या पाचव्या महिन्यात आपल्याला अपेंडिक्सची शस्त्रक्रिया करावी लागल्याचं सांगितलं. 


(Operation) शस्त्रक्रिया पूर्ण झाली, पण त्यानंतर मात्र दियाच्या शरीरात संसर्ग झाला होता. 'माझ्या प्लेसेंटामधून रक्तस्त्राव होऊ लागला होता. तेव्हा तुमच्या बाळाला बाहेर काढावं लागेल, असा सल्ला डॉक्टरांनी दिला. दोघांच्याही जीवाला तेव्हा धोका होता. जन्मानंतर अवघ्या 36 तासांनीच बाळाला शस्त्रक्रियेचा सामना करावा लागला होता', असं तिनं सांगितलं. 



ज्यावेळी दियाच्या बाळावर शस्त्रक्रिया झाली, तेव्हा ती वैयक्तिकपणे त्याच्यापाशी उपस्थित राहू शकत नव्हती. तो NICU मध्ये होता आणि दियाला त्याला स्पर्श करण्याचीही परवानगी नव्हती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये हे सर्वकाही घडत असतानाच आठवड्यातून फक्त दोनदा तिला बाळाला भेटण्याची परवानगी होती. 


संकटं कमी होण्याचं नाव घेत नव्हती, पण दियानं निर्धार केला होता की बाळाला ती काहीही होऊ देणार नाही. तिचा हा विश्वास सार्थ ठरला आणि हळुहळू सर्व संकटं दूर झाली.