मुंबई : सेलिब्रिटी म्हटलं की, त्यांच्या आलिशान जीवनशैलीचा वाटमारा हेवा ओघाओघानं आलाच. अमूक एका कंपनीची गाडी, तमुक एका ब्रँडचे कपडे आणि असा बराच मोठा थाट ही सेलिब्रिटी मंडळी सर्वांसमोर आणताना दिसतात. सहाजिकच त्यांच्या जगण्याचा अनेकांनाच प्रचंड हेवा वाटतो. (Bollywood Actress)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण, या मायानगरीत तुम्ही राहत असाल तर ती तुम्हाला कधी कोणता दिवस दाखवेल याची शाश्वती नाही.


सध्या एका अभिनेत्रीला याचीच प्रचिती येत आहे. जिनं लाखोंची कार दारात उभी असतानाही ऑटो रिक्षानं प्रवास करण्याला पसंती दिली. 


ही अभिनेत्री आहे, इशा गुप्ता. सूत्रांच्या माहितीनुसार जीममधून बाहरे पडल्यानंतर ती काही वेळ रस्त्याच्या कडेला उभी राहिली. ज्यानंतर तिथे एक रिक्षा आली. 


रिक्षा येताच ईशा त्यामध्ये बसली आणि त्या ठिकाणहून निघून गेली. आता तिच्या या ऑटो प्रवासामागे आणखी कोणतं वेगळं कारण होतं का, ते मात्र अद्यापही स्पष्ट होऊ शकलेलं नाही. 


दरम्यान, ईशा सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय आहे. दर दिवशी तिची एखादी तरी लक्ष वेधणारी पोस्ट असते. त्यातही तिचे बोल्ड फोटो चर्चांना विशेष वाव देणारे ठरतात असं म्हणायला हरकत नाही. 



सध्याच्या घडीला खासगी आयुष्य गुलदस्त्यात ठेवणारी ही अभिनेत्री मॅनुअल कँपोस ग्वालर (Manuel Campos Guallar) याला डेट करत आहे. त्याच्यासोबतचे अनेक फोटोही ती आता जाहीरपणे शेअर करताना दिसते.