मुंबई : अभिनेत्री जेनेलिया देशमुख आणि अभिनेाता रितेश देशमुख यांच्या मुलाचा म्हणजेच रिआनचा वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला. रिआनच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित एका पार्टीला बऱ्याच सेलिब्रिटींनी त्यांच्या मुलांसह हजेरी लावली. ज्यानंतर आता अभिनेत्री जेनेलिया डिसूजा देशमुख हिने तिच्या मुलासाठी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टच्या माध्यमातून तिने एक आई म्हणून आपल्या सर्व भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रिय रिआन... असं लिहित तिने मुलासाठीच्या पोस्टती सुरुवात केली. अतिशय सरळ, सोप्या शब्दांत तिने लिहिलेलं हे पत्र/ पोस्ट लिहिली आहे. 'अनेक पालक म्हणतात की, आपली मुलं मोठी होऊ नयेत. वेळ असाच कायमस्वरुपीच थांबला पाहिजे. पण, मी तसं म्हणत नाही.... तू तुझ्या जीवनातील प्रत्येक प्रसंग आनंददायीपणे जगावस असं मला वाटतं', असं लिहित एक परिपूर्ण युवक आणि पुरूष म्हणून आपल्या मुलाने मोठं व्हावं असंच आपल्याला वाटत असल्याची भावना तिने व्यक्त केली. 


'तुला पंख देत त्या पंखांसाठीचा वारा मी होऊ इच्छिते..... आयुष्य हे खडतर आहे, पण तू त्याहूनही खंबीर आहेस हे मी तुला सांगू इच्छिते. कोणताही प्रसंग असो, मी तुझ्यावरच विश्वास ठेवेन... कायम....', असं लिहित आपलं मुलावर किती प्रेम आहे हे जेनेलियाने शब्दांवाटे मांडण्याचा प्रयत्न केला. 




एक अभिनेत्री असण्यासोबतच जेनेलियाने लग्नानंतर तिच्या वैवाहिक आयुष्याला प्राधान्य देत कुटुंबाची जबाबदारी घेतली. यामध्ये आपली कामगिरी प्रशंसनीयपणे पार पाडत तिने अनेकांसाठी आदर्शच प्रस्थापित केला. २०१४ मध्ये रितेश आणि जेनेलियाच्या जीवनात रिआन या चिमुकल्याचं आगमन झालं होतं. त्याच्या येण्याने या सेलिब्रिटी जोडीच्या कुटुंबात आनंदाची उधळण झाली होती.