VIDEO : थरारक व्हिडिओ पोस्ट करत जॅकलिन म्हणाली, `हो....मी स्वत:च स्टंट करते`
तिच्या या व्हिडिओला अनेक व्ह्यूज मिळाले आहेत.
मुंबई : बॉलिवूड विश्वात पदार्पण करत आपलं वेगळं स्थान निर्माण करण्याच श्रीलंकन सुंदरी जॅकलिन फर्नांडिस यशस्वी झाली. पाहता पाहता तिच्या वाट्याला काही अद्वितीय भूमिकाही येऊ लागल्या. ज्या निभावण्यासाठी तिने नेहमीच बरीच मेहनतही घेतली. मग ते एखादं नृत्य असो किंवा एखादा स्टंट. प्रत्येक परिने आपल्याच काही बदल करत आणि इतरांच्या मार्गदर्शाने तिने स्वत:ची कला आणखी खुलवण्याचाच प्रयत्न केला. सध्याही ती एका अशाच व्हि़डिओमुळे चर्चेच आहे.
खुद्द जॅकलिननेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये ती एक थरारक कृत्य करताना दिसत आहे. दोरखंडाच्या सहाय्याने दगडांवरुन उतरण्याचा प्रयत्न करत आहे. तिचा हा व्हिडिओ पाहता 'रॉक क्लाईंबिंग' करण्याचं ती प्रशिक्षण घेत असल्याचं पाहायला मिळत आहे.
जॅकलिनसोबत तिचा प्रशिक्षकही या व्हिडिओमध्ये दिसत आहे. तीसुद्धा मोठ्या कुतूहलाने या संपूर्ण प्रक्रियेविषयी माहिती घेत आहे. माहिती मिळताच ती अगदी उत्साहात त्या दडगांवरून दोरखंडाच्या सहाय्याने खाली उतरण्यास सुरु वात करते. आतापर्यंत या व्हिडिओला ४० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर, काही नेटकऱ्यांनी कमेंट बॉक्समध्ये तिची प्रशंसा केली आहे.
असा एखादा व्हिडिओ पोस्ट करत प्रेक्षकांचं लक्ष वेधण्याची ही तिची पहिलीच वेळ नाही. शारीरिक सुदृढता आणि व्यायाम यांना प्राधान्य देणाऱ्या या अभिनेत्रीने यापूर्वीही काही व्हिडिओ पोस्ट केल्या होत्या. ज्यामध्ये तिने अनेकांनाच थक्क केलं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ त्यात नव्याने जोडला गेला आहे हे असं म्हणणं वावगं ठरणार नाही.