`मी सुंदर नाही पण...` बॉलीवूड पदार्पणावर जान्हवी कपूरचं मोठं वक्तव्य
श्रीदेवी यांची मुलगी म्हणून तिची ख्याती सगळीकडेच आहे.
Janhavi Kapoor on Her Bollywood Debut: अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या अभिनयानं आता सगळ्यांनाच मंत्रमुग्ध करून सोडते आहे. तिचा धडक हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून जान्हवीनं बॉलीवूडमध्ये चांगलीच मजल मारली आहे. (bollywood actress janhavi kapoor bollywood debut karan johar star kids)
श्रीदेवी यांची मुलगी म्हणून तिची ख्याती सगळीकडेच आहे. परंतु मध्यंतरी तिला प्रचंड ट्रोलिंगला सामोरे जावे लागले. याबाबतीत असणारे सर्व गैरसमजही जान्हवीनं दुर करण्याचा प्रयत्न केला होता पंरतु तरीही ती जास्त ट्रोलच होत राहिली आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत तिनं खुलासा केला आहे की ती सुंदर जरी दिसत नसली तरी सेटवर आल्यावर इतरांपेक्षा सर्वात जास्त मेहनत घेते.
आणखी वाचा - आई नीतू कपूरनं Ranbir चा फोटो शेअर करतानाच नेटकरी म्हणाले...
सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाल्यानंतर आपली भावना चाहत्यांसोबत शेअर करण्यासाठी जान्हवीनं एक खुलासा केला आहे. ती म्हणाली की, "लोकांना वाटते की मी स्वत:ला हलक्यात घेते. हा त्यांचा माझ्याबद्दलचा सर्वात मोठा गैरसमज आहे. त्यांना वाटते कारण मी एका अभिनेत्रीची मुलगी आहे म्हणजे माझ्यासाठी सगळ्याच गोष्टी सोप्या आहेत. पण मला माहित नाही की मेहनत करायला कधीच काही हरकत नसते आणि मीही करते.
आणखी वाचा - करीना, विद्या बालनसोबत जुळलं नाव, पण अभिनेत्याने अरेंज मॅरेज करत सगळ्यांनाच दिला धक्का
जान्हवी कपूर पुढे म्हणाली की मी कदाचित सर्वात सुंदर अभिनेत्री असू शकत नाही परंतु मी तुम्हाला खरोखरच सांगते की मी सेटवर सर्वात जास्त परिश्रम करणारी व्यक्ती आहे. आपल्या करिअरबद्दल बोलताना जान्हवी म्हणाली की, “मी एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करू शकत नाही कारण मला त्याचा खूप लवकर कंटाळा येतो. मला गोष्टींची पुनरावृत्ती अजिबात आवडत नाही. मला आव्हानं आवडतात कारण शेवटी त्यांच्यामुळेच कळते की मी प्रगती करतये की नाही, असं तिनं सांगितलं.
जान्हवीनं आत्तापर्यंत धडक, घोस्ट स्टोरीज, गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल (2020), रूही (2021) मध्ये काम केलं आहे. ती सिद्धार्थ सेन दिग्दर्शित गुड लक जेरीमध्ये दिसली होती.