मुंबई  :  बॉलीवूड अभिनेत्री पडद्यावर तसेच खऱ्या आयुष्यातही टॅबू तोडण्यासाठी प्रसिद्ध आहेत. दुसऱ्या धर्मात लग्न करणं किंवा आपल्यापेक्षा लहान मुलांशी लग्न करणं, बऱ्याच नायिका असं बिनधास्तपणे करतात. त्याचबरोबर बरेच कलाकार लिव्ह इन रिलेशनशिपमध्येही राहतात.  लिव्ह-इन रिलेशनशिपला अजूनही समाजात स्वीकारलं जात नाही, तर बॉलिवूडच्या नायिका लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये प्रेग्नंटही राहत नाहीत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूड अभिनेत्री कल्कि कोचलिन (Kalki Kochlin) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. कल्कि ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. 


अनुराग कश्यपपासून (Anurag Kashyap) घटस्फोट घेतल्यानंतर कल्की तिचा बॉयफ्रेंड गाय हर्शबर्ग ()सोबत ती लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहत आहे. दोघांनीही आपल्या मुलीचं नाव सॅफो ठेवले आहे आणि अनेकदा तिचे गोंडस फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 


बी-टाऊनची प्रसिद्ध अभिनेत्री कल्की कोचलिनने 'देव डी' (Dev D) आणि 'ये जवानी है दिवानी' (Yeh Jawani Hai Diwani) सारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये दमदार अभिनय केला आहे. त्याचबरोबर कल्कीचं खरं आयुष्यही खूप मनोरंजक आहे. कल्की कोचलिनने तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात चित्रपट निर्माता अनुराग कश्यपशी लग्न केलं. मात्र, त्यांचं लग्न फार काळ टिकलं नाही आणि लवकरच दोघांचा घटस्फोट झाला.


लिव्ह इन प्रेग्नंसी 
अनुराग कश्यपपासून घटस्फोट घेतल्यानंतर कल्कीने गाइ हर्शबर्ग या इस्रायली वंशाच्या चित्रकाराशी नातं जोडलं. ती त्याच्यासोबत लिव्ह-इनमध्ये राहू लागली आणि लग्न न करताच, अभिनेत्रीने 2020 मध्ये एका मुलीला जन्म दिला.  


सेक्स लाइफवर केलं मोठं वक्तव्य
कल्की तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. एकदा दिलेल्या एका मुलाखतीत कल्कीने तिच्या सेक्स लाईफबद्दल खुलासा केला आणि म्हणाली, " तिशीत असताना माझी सेक्स लाईफ खूप चांगली आहे. मला माझ्या शरीराची अजिबात लाज वाटत नाही. मी आता बेडवर जरा जास्तच स्वार्थी आहे.''