मुंबई : बॉलीवूडची 'धाकड गर्ल' उर्फ ​​कंगना रानौत (Kangana Ranaut) आपल्या अनेक विधानांमुळे चर्चेत असते. आता पुन्हा एकदा असेच एक खळबळजनक विधान करून ती चर्चेत आली आहे. इन्टाग्रामवर तिने एक पोस्ट केली होती. या पोस्टच्या माध्यमातून तिने एका बॉलिवूडमधल्या प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्मात्याला टार्गेट केले आहे. विशेष म्हणजे या दोघांमधील हा वाद जूना आहे. या वादामुळेचं दोघांमध्ये मोठी वादाची ठिणगी पडली होती. नेमका हा वाद कोणता होता? आणि तिची नेमकी पोस्ट काय आहे, ती जाणून घेऊयात. 
 
बॉलिवूडमधील कंगणा रानौत (Kangana Ranaut) आणि दिग्दर्शक करण जोहरमध्ये (Karan Johar) छत्तीसचा आकडा आहे. कंगणाने नेहमीच करण जोहरला टार्गेट केले आहे. आता पुन्हा एकदा तिने इन्टाग्रामवर स्टोरी टाकत करण जोहरवर टीका केली आहे. करण जोहरचा प्रसिद्ध चॅट शो 'कॉफी विथ करण 7' आजपासून नेटफ्लिक्सवर सुरू होत आहे. हा निमित्त साधत तिने जूना वाद उरकून काढत पून्हा एकदा करण जोहरवर टीका केली.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोस्टमध्ये काय?
“पापा जोचे (करण जोहर) कॉफी एपिसोड्स आजपासून OTT वर प्रीमियर होणार आहेत. पापा जो यांना हार्दिक शुभेच्छा. पण या एपिसोडचे काय? अरे सॉरी...सर्जिकल स्ट्राईक, घरात घुसून मारलेले ना, माझा हा सर्वात लोकप्रिय एपिसोड होता, तरीही टीव्हीवर बॅन करण्यात आला होता, असे कंगणा राणौतने पोस्ट केले होते. या पोस्टमधून तिने करण जोहरला पुन्हा टार्गेट केले. 



करण जोहरला केलं लोकप्रिय!
कंगना रानौतने (Kangana Ranaut) तिच्या इंस्टा स्टोरीवर एका न्यूज पोर्टलवर प्रकाशित करणच्या लेखाचा स्क्रीनशॉट टाकला आणि तिने करणला लोकप्रिय केल्याचे सांगितले. कंगनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, "त्याच्या सर्व कामांपेक्षा मी त्याला अधिक लोकप्रिय केले आहे."


नेमका वाद काय? 
'कॉफी विथ करण'च्या 5 व्या सीझनमध्ये कंगणा रणौतने हजेरी लावली होती. कंगना 'रंगून' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी 'कॉफी विथ करण' शोमध्ये पोहोचली होती. तिच्यासोबत सैफ अली खानही दिसला होता. बॉलिवूडमधील घराणेशाहीला पाठींबा देत असल्याचा आरोप तिने करण जोहरवर लावला होता. तसेच तिने करणची क्लास लावत त्याची बोलती बंद केली होती. आणि नंतर हा एपिसोड बॅन करण्यात आला होता. या वादानंतर दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली होती.